‘येक नंबर’ हा मराठी चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा चांगलाच चर्चेत होता. तेजस्विनी पंडीत मुख्य भूमिकेत असणारा हा सिनेमा भलताच गाजला होता. एका कट्टर कार्यकर्त्याच्या निष्ठा, संघर्ष, आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहण्याची संधी मिळाली नाही आता त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर होणार आहे. कधी आणि कुठे हा सिनेमा पाहायला मिळणार? चला जाणून घेऊया...
‘येक नंबर’ या चित्रपटात प्रताप नावाच्या कार्यकर्त्याची गोष्ट सांगतो, जो राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. प्रताप अचानक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे स्वतःच्या निष्ठांवर प्रश्न विचारू लागतो आणि सत्याचा शोध घेतो. त्याच्यासमोर हळूहळू सत्य उलघडते आणि तो यामध्ये अडकत जातो. शेवटी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने तो सगळ्यातून बाहेर पडतो. या चित्रपटाची कथा ही सर्व प्रेक्षकांना आवडली होती.
एका दृश्यात प्रताप दारूच्या नशेत राज ठाकरे यांच्या पोस्टरवर शिव्या घालत रस्त्यावर गोंधळ घालतो. कॅमेरा लांब ठेवून शूटिंग केल्यामुळे सीन खऱ्यासारखा वाटला. पण शूटिंगदरम्यान खऱ्या पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या प्रतापला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. काही वेळाने त्यांना हे शूटिंग असल्याचं कळलं. सत्य समजल्यानंतर पोलिसांनी धैर्य घोलपच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं, “तुझा अभिनय खरंच येक नंबर आहे!”
वाचा: AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर
‘येक नंबर’ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर निष्ठा, सत्य, आणि स्वतःच्या विचारांचा शोध यावर एक सशक्त संदेश देतो.२६ जानेवारी २०२५ रोजी हा सिनेमा झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या