मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : हा दागिना सराफाच्या घरातच मिळू शकतो; 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं मनसेकडून अनोखं अभिनंदन

Viral Video : हा दागिना सराफाच्या घरातच मिळू शकतो; 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं मनसेकडून अनोखं अभिनंदन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 01, 2024 05:35 PM IST

Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar: ‘हा दागिना केवळ सराफाच्या घरीच मिळू शकतो’, असं म्हणत राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे

Raj Thackeray praising  Maharashtra Bhushan actor Ashok Saraf
Raj Thackeray praising Maharashtra Bhushan actor Ashok Saraf

Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar: मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२३’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला जाणार आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्ये देखील आपलं वर्चस्व गाजवलं आहे. यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाल्यानंतर आता सगळ्याच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, नुकताच राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अभिनेते अशोक सराफ यांनी जवळपास गेली ५ दशकं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. पाच दशकं मनोरंजन विश्वाचे बदलते ट्रेंड स्वीकारून, त्यात स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यात अशोक सराफ यशस्वी ठरले आहेत. आजही अशोक सराफ यांची जादू प्रेक्षकांच्या मनावर आहे. अशोक सराफ यांचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत मी त्यांची अनेक नाटकं आणि सिनेमे पाहिले आहेत. आजघडीला कदाचित ते एकमेव अभिनेते असतील ज्यांनी त्याकाळापासून ते आजपर्यंत अगदी समोर कुणीही असो तरी अगदी फरक न पडता नेहमी आपला दमदार अभिनय सादर केला. त्यांनी नेहमीच चित्रपट आणि नाटकांवर आपला वेगळा प्रभाव पाडला आहे.’

Ramayan: रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा पाहायची? मग ही बातमी नक्की वाचा

पुढे राज ठाकरे म्हणाले की, ‘इतकी वर्ष हे टिकवून सोपं नाहीये. काही दिवसांपूर्वीच मी त्यांचं व्हॅक्यूम क्लीनर नावाचं नाटक पाहिलं. या नाटकात जेव्हा अशोक सराफ यांची एन्ट्री झाली, तेव्हा टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट सुरू होता. ५०-६० वर्ष स्वतःबद्दलचं कुतूहल टिकवून ठेवणं, हे सोपं काम नाहीये. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर ऑडीटोरियमचा अगदी कोपरा देखील भरला जातो. हे सगळं सोपं नाहीये. अशोक सराफ जर आता दक्षिणेत तर, मुख्यमंत्री झाले असते. ४० फुटांचे कटआउट लावून त्यावर दूध टाकलं गेलं असतं.’

‘पण हा दागिना केवळ सराफाच्या घरीच मिळू शकतो’, असं म्हणत राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तर, नेटकरी देखील आपल्या लाडक्या अशोक मामांचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

WhatsApp channel