Raj Thackeray Birthday: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे लाडके राजकीय व्यक्तिमत्त्व राज ठाकरे यांचा आज (१४ जून) वाढदिवस आहे. या खास निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रातून, राजकीय क्षेत्रातून आणि कलाकार मंडळींकडून राज ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठमोळे दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी आपल्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.
राज ठाकरे आणि केदार शिंदे यांच्यात छान मैत्रीचे नाते आहे. केदार शिंदे नेहमीच राज ठाकरे यांचं कौतुक करताना दिसतात. राज ठाकरे आपल्यासाठी काय आहेत, हे त्यांनी आपल्या पोस्टमधून अवघ्या दोन शब्दांत कौतुक करत सांगितले आहे. ‘राजा माणूस... वाढदिवस शुभेच्छा’ असं म्हणत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आज राज ठाकरे आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहेत.
मराठी मनोरंजन विश्व आणि राज ठाकरे यांचं नातं खूप जवळचं आणि घनिष्ठ आहे. राजा ठाकरे नेहमीच मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांसाठी पुढाकार घेताना दिसतात. नेहमीच मराठी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे. यामुळेच कलाविश्वात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत आहेत. आता केदार शिंदे यांच्या पोस्टवर कमेंट्स करून चाहते देखील आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा देत आहेत.
‘वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा’, ‘दोन खूप लाडकी व्यक्तिमत्व’, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राज साहेब’ अशा कमेंट्स करत सगळे शुभेच्छा देत आहेत.