Raj Kapoor Movie Kissa : आज ज्या प्रकारे निर्माते त्यांच्या चित्रपटांवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, त्याचप्रमाणे राज कपूरही त्यांच्या चित्रपटांवर पाण्यासारखा पैसा खर्च करायचे. त्यांच्या एका चित्रपटामुळे त्यांनी छत्रीचा ट्रेंड वाढवला होता. हा चित्रपट त्यांच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. राज कपूर यांनी आपला चित्रपट भव्यदिव्य वाटावा याची पूर्ण काळजी घ्यायचे.
राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट आणि व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांना आजही लोक विसरू शकलेले नाहीत. १९५५ मध्येही त्यांचा असाच एक कल्ट क्लासिक चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला होता. तो चित्रपट होता राज कपूर आणि नर्गिस दत्त यांचा 'श्री ४२०' हा चित्रपट. अनेकांना हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटातील एक गाणे तूफान गाजले होते. इतकंच काय तर, आजही त्या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळते.
अभिनेत्या-दिग्दर्शक असणाऱ्या राज कपूर यांचा तो चित्रपट आजही लोकांना पाहायला आवडतो. मात्र, या चित्रपटाला त्यावेळी प्रदर्शित झाल्यानंतरही अजिबात यश मिळाले नव्हते. 'श्री ४२०' हा चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला, तेव्हा लोकांना तो फारसा आवडला नाही. पण, नंतर हा चित्रपट कल्ट ठरला. या चित्रपटातील एक गाणे 'प्यार हुआ इकरार हुआ है…' हे लोकांना खूप आवडले. या गाण्यानंतर बाजारात छत्र्यांचाही तुटवडा निर्माण झाला होता. पण, या चित्रपटानंतर दुकानदारांनाही खूप फायदा झाला.
१९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्री ४२०'मध्ये राज कपूर यांनी एका टपोरीची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटातील राज कपूर आणि नर्गिस दत्त यांचा अभिनय लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांना वेड लावले होते. या गाण्यात राज कपूर आणि नर्गिसची लोकांना केमिस्ट्री खूप आवडली होती. पण सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नसला, तरी नंतर या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील 'प्यार हुआ इकरार हुआ' हे गाणे हिट झाल्यानंतर बाजारात छत्र्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच चित्रपटानंतर छत्र्यांच्या किमती वाढल्या होत्या. या गाण्यात इतक्या छत्र्या वापरण्यात आल्या होत्या की त्यांचा ट्रेंड वाढला होता. या चित्रपटानंतर दुकानदारांनाही खूप फायदा झाला.
संबंधित बातम्या