एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता म्हणून राज बब्बर ओळखले जात होते. त्यांनी १९७५ साली नादिराशी विवाह केला. त्यावेळी हा अंतरजातीय विवाह सामान्य नव्हता. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव जुही राज बब्बर आहे. जुहीने नुकताच एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. तिने सांगितले की लग्नानंतर तिच्या आईचा धर्म बदलण्याचा प्रयत्न वडिलांच्या कुटुंबीयांनी केला होता. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...
जुही बब्बरने नुकताच रेट्रोशी संवाद साधला. त्यावेळी तिने सांगितले की, आईचा धर्म बदलण्याचा प्रयत्न करत असताना आजोबांनी पाठिंबा दिला. जुही बब्बर म्हणाली की, तिच्या वडिलांच्या कुटुंबाची इच्छा होती की तिची आई नादिराने धर्म बदलावा. त्यांना तिचं नाव निर्मला किंवा दिशा ठेवायचं होतं. जुहीच्या आजोबांनी मात्र या गोष्टीला नकार दिला. 'आम्ही भारतीयत्वाचे प्रतीक आहोत. आम्ही आमच्या कुटुंबात फक्त एक ख्रिश्चन मुलगी येण्याची वाट पाहत आहोत. जेणेकरून आमच्या कुटुंबात सर्व धर्माचे लोक होतील. आम्ही सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो.'
जुही पुढे सांगते, "आम्ही ईद आणि दिवाळी दोन्ही उत्साहात साजरे करतो. असा कोणताही सण नसतो ज्यात आपल्या आई-वडिलांचा सहभाग नसतो. मी म्हणेन की माझे कुटुंब खूप धार्मिक आहे. प्रत्येक सण, वाढदिवस आणि नववर्षाला एकत्र राहणं ही आमच्या कुटुंबाची संस्कृती आहे. इतर ३१ डिसेंबरला पार्टी करतात आणि आम्ही घरी एकत्र राहतो."
वाचा: चिप्सच्या दुकानात बसून घेतले अभिनयाचे धडे, अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी वाचून डोळ्यात येईल पाणी
या मुलाखतीमध्ये जुही पुढे म्हणाली की, 'तिच्या आई-वडिलांमध्ये धर्माविषयी कधीच वाद झाला नाही. दोघेही एकमेकांच्या धर्माचा आणि विचारांचा आदर करतात. जुही म्हणाली, 'ते टिपिकल धार्मिक नाहीत. माझे आजी-आजोबा सज्जाद झहीर आणि रझिया सज्जाद झहीर होते. त्यांनी उपवास केला नाही तर ईद साजरी केली. माझे आजोबा नियमित नमाजही करत नव्हते, ते ईदच्या नमाजचे पठण करायचे.'
संबंधित बातम्या