Raj Anadkat Engagement: 'बबिता'सोबत साखरपुड्यावर 'टप्पू'नेही दिली प्रतिक्रिया; पोस्ट लिहीत राज म्हणाला...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Anadkat Engagement: 'बबिता'सोबत साखरपुड्यावर 'टप्पू'नेही दिली प्रतिक्रिया; पोस्ट लिहीत राज म्हणाला...

Raj Anadkat Engagement: 'बबिता'सोबत साखरपुड्यावर 'टप्पू'नेही दिली प्रतिक्रिया; पोस्ट लिहीत राज म्हणाला...

Mar 14, 2024 11:27 AM IST

Raj Anadkat-Munmun Dutta Engagement:

Raj Anadkat Denied Engagement Rumor
Raj Anadkat Denied Engagement Rumor

Raj Anadkat Denied Engagement Rumor With Munmun Dutta: छोट्या पडद्यावरची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत 'बबिताजी' साकारणाऱ्या मुनमुन दत्ताच्या साखरपुड्याच्या चर्चेने सगळीकडेच गदारोळ माजला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'टप्पू'ची भूमिका करणाऱ्या राज अनादकत या अभिनेत्याशी तिने साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते. राज अनादकत हा 'बबिताजी' अर्थात मुनमुन दत्ता हिच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान आहे. आता राजने देखील या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये बबिताला आँटी म्हणणाऱ्या 'टप्पू'शी म्हणजेच राजशी खऱ्या आयुष्यात साखरपुडा केल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चांगलाच हल्लाकल्लोळ माजला होता. दोघांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता दोन्हीही कलाकारांकडून यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पूची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता राज अनादकत याने आता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने ही पोस्ट शेअर करून साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

Viral Video: ‘दिल दोस्ती दुनियादारी’सह बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता दंग झाला भजनात! व्हायरल व्हिडीओ बघाच

काय म्हणाला राज अनादकत?

राज अनादकत याच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'तुम्ही ज्या बातम्या कालपासून सोशल मीडियावर पाहत आहात, त्या सगळ्याच अतिशय बिनगुडाच्या आहेत. या सगळ्या बातम्या केवळ अफवा आहेत. - टीम राज अनादकत'. राजच्या टीमकडून ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, त्यांनी साखरपुड्याच्या या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याचाच अर्थ दोन्हीही कलाकारांनी या गोष्टीला थेट नकार दिला आहे.

चर्चेत आलीये मुनमुन आणि राजची कथित प्रेमकहाणी!

गेल्या काही महिन्यांपासून मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. दोघांचे प्रेम प्रकरण गाजण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वयातील मोठे अंतर. सध्या राज अनादकत हा २७ वर्षांचा आहे, तर मुनमुन दत्ता ही ३६ वर्षांची आहे. याचाच अर्थ दोघांच्या वयात तब्बल नऊ वर्षांचा गॅप आहे. स्वतःपेक्षा वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याबद्दल मुनमुन दत्ताला वारंवार ट्रोल केले जात होते. जेव्हा त्यांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आली, तेव्हा देखील मुनमुन दत्ताला जोरदार ट्रोल केले गेले. यावर प्रतिक्रिया देताना मुनमुन दत्ताने देखील म्हटले की, 'या केवळ अफवा असून, मी अशा अफवांवर वेळ वाया घालवत नाही.' दोन्ही कलाकारांनी त्यांच्या डेटिंगच्या आणि साखरपुड्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Whats_app_banner