Rahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण-rahat fateh ali khan on talked about bollywood celebs destination wedding ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

Rahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 02, 2024 12:28 PM IST

Rahat Fateh Ali Khan Interview: गायक राहत फतेह अली खानने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात यामागिल कारण सांगितले आहे. चला जाणून घेऊया काय आहे कारण?

Rahat Fateh Ali Khan
Rahat Fateh Ali Khan

Rahat Fateh Ali Khan on Bollywood Wedding: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान हा त्याच्या गाण्यांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी घरात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्यामुळे चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी माफी देखील मागितली. आता राहत एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने भारतीय सेलिब्रिटी हे परदेशात जाऊन लग्न का करतात या मागचे कारण सांगितले आहे.

राहत फतेह अली खानने नुकताच पाकिस्तानी यूट्यूबर अदील आसिफला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने भारतीय कलाकार हे परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग का करतात यामागील कारण सांगितले आहे. त्याने 'भारतीय कलाकार आमच्यासारख्या (पाकिस्तानी) कलाकारांकडून लग्नात परफॉर्म करुन घेण्यासाठी परदेशात लग्न करतात. सध्या भारतात बंदी आसल्यामुळे ते शक्य होत नाही' असे राहत म्हणाला.
वाचा: ओटीटीवर होणार मोठा धमाका! संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ची जोरदार चर्चा

पुढे राहात म्हणाला, 'आम्ही भारतात जाऊ शकत नाही. पण जे परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात त्यांना मी क्रेडिट देऊ इच्छितो. कारण त्यांनी मोठ्या मनाने हा ट्रेंड सुरु केला. भारतात पाकिस्तानी कलाकारांना एण्ट्री नाही. तिथे राहत फतेह अली खान, शफकत अमानत अली, आतिफ असलम हे कलाकार परफॉर्म करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते परदेशात जाऊन लग्न करतात आणि पुन्हा भारतात लग्न करतात. जेणे करुन आमच्या सारखे कलाकार लग्नात परफॉर्म करु शकतील.'

भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

१८ डिसेंबर २०१६मध्ये जम्मू कश्मीपमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले आणि काही जखमी झाले. या हल्लाची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यावर भारत सरकारने मोठे पाऊल उचलले होते. पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व कलाकारांवर बंदी घातली होती. ही बंदी आजही कायम आहे.

कोण आहे राहत फतेह अली खान

राहत फतेह अली खानची गाणी भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याने सलमान खानच्या 'दबंग ३' या चित्रपटातील गाणे गायले होते. त्याचे हे गाणे तुफान हिट झाले होते. तसेच लव्ह स्टोरी ऑफ ९० या चित्रपटातील तो गाणे गाणार आहे.

विभाग