Rahat Fateh Ali khan : राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rahat Fateh Ali khan : राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं

Rahat Fateh Ali khan : राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक; मात्र गायकाने व्हिडिओ शेअर करत वृत्त नाकारलं

Updated Jul 22, 2024 08:55 PM IST

Rahat Fateh Ali Khan Arrest Update : राहत फतेह अली खान यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत दुबईत अटक झाल्याचे वृत्त फेटाळत ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.

 राहत फतेह अली खान
राहत फतेह अली खान

Rahat Fateh Ali Khan Arrest Update: पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना दुबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. एका कार्यक्रमासाठी ते दुबईला आले होता. मात्र विमानातून उतरताच त्यांना अटक करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना बुर्ज दुबई पोलिस स्थानकात नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही वेळाने officialrfakworld या अकाऊंटवरुन राहत फतेह अली खान यांनी अटकेचे वृत्त फेटाळत अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन चाहत्यांना केलं आहे.

राहत फतेह अली खान ला दुबई विमानतळावर अटक झाल्याची अफवा पसरल्यानंतर पाकिस्तानी गायकाने आपल्या चाहत्यांना खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले इन्स्टाग्रामवर व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी हे आवाहन केले आहे. 

व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की,  'मी माझी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी दुबईला आलो आहे. माझ्या गाण्यांचे सर्व काम उत्तम चालले आहे. इथं सगळं ठीक आहे".

"मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मी अनेक गाण्यांवर काम करत आहे, आणि लवकरच एक सुपरहिट गाणे घेऊन परत येईन जे जग व्यापून टाकेल. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्यावर विश्वास ठेवू नका.

राहत पुढे म्हणतात, "माझ्या शत्रूंकडून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांवर तुमचा वेळ वाया घालवू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तू च माझी शक्ती आहेस. माझे प्रेक्षक आणि माझे चाहते हीच माझी शक्ती आहे. आय लव्ह यू ऑल".

 

राहत विरोधात त्याचे माजी मॅनेजर सलमान अहमद यांनी अनेक तक्रारी दाखल केल्यानंतर त्यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गायकाला अटकेनंतर बुर्ज दुबई पोलिस ठाण्यात नेण्यात आले, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राहत यांना त्यांच्या माजी मॅनेजरने मानहानीच्या तक्रारीवरून सोमवारी दुबईत अटक केली. राहत यांनी काही महिन्यांपूर्वी वादातून मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला राहत एका व्यक्तीला थप्पड मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या व्हिडिओत राहत 'माझी बाटली कुठे आहे?' असा प्रश्न विचारत चप्पलने त्या व्यक्तीला वारंवार मारहाण करताना आणि थप्पड मारताना दिसत आहेत.

त्यानंतर मन की लगन आणि जिया धडक धडक सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या गायकाने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत त्याद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. 

Whats_app_banner