Raghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार अनोख्या नात्याची प्रेमकहाणी!-raghu 350 marathi movie releasing on 6september 2024 film teaser out watch here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार अनोख्या नात्याची प्रेमकहाणी!

Raghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार अनोख्या नात्याची प्रेमकहाणी!

Aug 11, 2024 09:04 AM IST

Raghu 350 Marathi Movie: चर्चेत असलेल्या अ‍ॅक्शन आणि रोमान्सची जोड असलेल्या मराठी ॲक्शनपट 'रघु ३५०' चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांना वेडं केलं आहे.

Raghu 350 Marathi Movie
Raghu 350 Marathi Movie

Raghu 350 Marathi Movie: मराठीतही ॲक्शन आणि भयपट चांगलेच गाजू लागले आहेत. रहस्यमय कथा प्रेक्षकांना देखील आवडू लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात आजवर रोमँटिक, ॲक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अ‍ॅक्शन आणि रोमान्सची जोड असलेल्या 'रघु ३५०' चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांना वेडं केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा अगदी थाटामामात संपन्न झाला. पोस्टर पाहिल्यानंतर, तर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी ‘रघु ३५०’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेमात राडा होणार की, राड्यातून प्रेम फुलणार असा मोठा प्रश्न टीझर पाहून पडला आहे. अल्पावधीतीच या टीझरला प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंबा मिळाला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

समोर आलेल्या टीझरमध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते आणि अदिती कांबळे यांचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणांना त्यांचं प्रेम मिळणार का?, या प्रेमासाठीची लढाई हे सारं टीझरमध्ये पाहून उत्सुकता वाढून राहिली आहे. चिन्मय, विजय, अदिती या कलाकारांसह या चित्रपटात तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, रामभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.

गुपित लवकरच उलगडणार!

रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी 'रघु ३५०' चित्रपटातून कळेल. बाईकवरून रावडी एन्ट्री घेतलेला तो इसम नेमका कोण आहे?, हे देखील गुलदस्त्यात असून या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनपट असल्याचं बोललं जातं. या नव्या कोऱ्या चित्रपटातून नेमकं कोणतं कथानक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार हे ६ सप्टेंबर २०२४ रोजी कळणार आहे. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Viral Video: समंथाची सवत शोभिता धुलिपाला सोशल मीडियावर ट्रोल! अभिनेत्रीचा व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच हैराण

'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलवली आहे. तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.