गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अनंत अंबानीचा लग्नसोहळा अखेर पार पडला. १२ जुलै रोजी अनंतने राधिका मर्चंटशी लग्न केले. लग्नात राधिका काय घालणार याची जोरदार चर्चा सुरु होती. आता राधिकाचे फोटो समोर आले आहेत.
राधिकाच्या या लेहंग्यावर सोन्याच्या तारांनी सुंदर असे नक्षीकाम केल्याचे दिसत आहे. तसेच लेहंग्यावरील मध्येमध्ये लाल रंगाची फुले उठून दिसत आहेत.
कपाळी लाल टिकली, ओठांना लाल लिपस्टिक, केसात गजरा अशा सिंपल मेकअपमध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत होती.