Anant Ambani Ganpati: मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब प्रत्येक सण अतिशय जल्लोषात साजरा करतात. सणाच्या निमित्ताने अंबानी कुटुंब नेहमी एकत्र येत असतं. आता देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखील अंबानी कुटुंब जल्लोष करताना दिसले आहे. या वर्षी अंबानी कुटुंबात अनेक वेळा सेलिब्रेशन होताना पाहायला मिळालं आहे. अनंत अंबानी-राधिक मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळे सोहळे पाहायला मिळाले. आता अंबानींच्या सुनेचा म्हणजेच राधिका मर्चंट हिचा हा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव होता. या सणात राधिका अतिशय उत्साहाने सहभागी झालेली पाहायला मिळाली. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सासू-सुनेचा धमाकेदार डान्स देखील पाहायला मिळाला.
मुकेश अंबानी यांच्या घरी दीड दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले होते. दीड दिवसांच्या उत्सवानंतर जल्लोषात बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली. ‘अँटीलियाचा राजा’ विसर्जनासाठी रवाना होताच, या मिरवणुकीत नीता अंबानी यांच्यासह अनेक कलाकारांनी देखील सहभाग घेतला. यावेळी नीता अंबानी आणि त्यांची नवी सून राधिका मर्चंट नाचताना देखील दिसल्या. नीता अंबानी या विसर्जणासाठी खास तयार झाल्या होत्या. त्यांनी सोन्याचा हार, मॅचिंग कानातले आणि बांगड्यांसह आकर्षक गुलाबी साडी परिधान करून, अतिशय हलका मेकअप केला होता. यासोबतच त्यांनी केसांचा आंबाडा बांधला होता.
बाप्पाच्या मूर्तीसोबत विसर्जनासाठी जाताना नीता अंबानी पाहुण्यांवर आणि बाप्पाच्या भक्तांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करताना दिसल्या. यावेळी त्यांनी प्रसाद वाटप देखील केले. विसर्जनाच्या या मिरवणुकीत राधिका मर्चंट उत्साहाने नाचताना दिसली. साध्या निळ्या रंगाची कुर्ती परिधान केलेल्या राधिकाने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते. पती अनंत अंबानीसोबत तिने बाप्पाला जल्लोषात निरोप दिला. सध्या या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये सगळ्यांचा जल्लोष दिसत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे अंबानी एकत्र विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी सगळ्यांच्या नजरा राधिका मर्चंटवर खिळल्या होत्या.
राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नानंतर त्यांचा हा एकत्र पहिलाच सण होता. त्यामुळे राधिका हा सण कसा साजरा करणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. तर, गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत राधिकाला बेभान होऊन नाचताना बघून सगळेच आनंदी झाले होते. यावेळी राधिकासोबत अनंत अंबानी देखील तिची साथ देताना दिसले. दोघांना एकत्र जल्लोष करताना बघून नीता अंबानी देखील खूप खुश होत्या. या आधी अंबानी कुटुंबाच्या दोन्ही सुनांनी मिळून गणपती बाप्पाची पूजा केली होती. याचे व्हिडीओ देखील सध्या खूप चर्चेत आहेत.