राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…

राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 09, 2024 07:39 PM IST

राधिका मदान इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करताना इरफानची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. राधिकाने एका मुलाखतीदरम्यान त्या काळाची आठवण सांगितली.

irrfan khan
irrfan khan

बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही. पण इरफान आपल्याला सोडून गेला आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट इरफान खानचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री राधिका मदान महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. राधिकाने या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितले की या चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या वेळी इरफान यांची प्रकृती खालावली होती. त्या वेळी इरफानने एक खास मेजे देखील पाठवला होता.

प्रकृतीविषयी लपवले सत्य

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये राधिका मदाने हजेरी लावली होती. त्यावेळी तिला इरफान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शुटिंगच्या वेळी तुम्हाला इरफान यांच्या प्रकृतीविषयी माहिती होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राधिकाने, 'नाही, कदाचित निर्मात्यांना कल्पना आली असेल. पण त्यांनी याविषयी काही सांगितले नव्हते. कदाचित त्यांना वाटत असेल ही नवी मुलगी आहे. तिच्या अभिनयावर परिणाम होऊ शकतो. ते मला नेहमी सांगायचे सगळं ठीक आहे. ते बरे आहेत. मला माहित नव्हतं की हे आणखी बिघडत चाललं आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्या हाफचं शूटिंग करत होतो, तेव्हा मला असंही सांगण्यात आलं नव्हतं की त्याची तब्येत बिघडत असल्याने ते शुटिंग पूर्ण करु शकले नाहीत' असे उत्तर दिले.
वाचा: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

शेवटच्या क्षणी मागितला सेल्फी

राधिका पुढे म्हणाली, "जेव्हा दुसरा हाफ लंडनमध्ये शुट झाला तेव्हा मला शेवटचा दिवस व्यवस्थित आठवतोय. इरफान सर आणि माझा तो शेवटचा सीन होता. त्यांच्यावर उपचार सुरु असल्यामुळे ते नेहमी प्रमाणे एनर्जेटीक दिसत नव्हते. ते भावनिक, मानसिकदृष्ट्या थकलेले दिसत होते. मला पहिल्यांदाच त्याचे डोळे असे वेगळे वाटले होते. संपूर्ण चित्रपटात मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शुटिंग केले होते. पण शेवटच्या सीनच्या वेळी ते खूप थकले होते. जाताना ते त्यांच्या गाडीमधून गेले. पण जेव्हा ते कारमध्ये बसले तेव्हा मी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी तुला नेहमीच सर्वजण माझ्यासोबत आठवणीत ठेवतील असे शेवटचे शब्द म्हणाले."

'अंग्रेजी मीडियम' हा दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

 

Whats_app_banner