बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ही इंडस्ट्रीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम परफॉर्मन्स दिले आहेत. राधिकाने अलीकडेच बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिचा बेबी बंप पाहून सर्वजण चकीत झाले होते. राधिकाने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली नव्हती आणि तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आता अभिनेत्रीने नुकताच तिच्या प्रेग्नेंसी प्रवासाबद्दल सांगितले आहे. पहिले तीन महिने हे फार कठीण असल्याचे तिने सांगितले.
राधिकाने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'मी पाच रात्री झोपले नाही. मला तिसऱ्या महिन्यात निद्रानाश झाला होता. मी झोपू शकत नव्हते. लोक मला सांगत आहेत की तू आनंदी रहा कारण तुला मूल होणार आहे. मला त्यांना मुक्का मारायची इच्छा होते. मी तुमच्याकडे माझी समस्या सांगत आहे आणि तुम्ही मला आनंदी राहा सांगत आहात.'
या मुलाखतीमध्ये राधिकाने असे ही सांगितले की, तिचा मुलांबद्दल कोणताही प्लान नव्हता. त्या दोघांसाठी देखील हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे. तसेच राधिकाच्या शरीरात बरेच बदल होत असल्याचे तिला जाणवत आहे. 'प्रेग्नेंसी ही काही गंमत नाही. कुणाचा गरोदरपणा हा खूप चांगला असतो तर काहींचा खूप कठीण असतो. गरोदरपण खूप अवघड असते आणि ते शरीरानुसार बदलते. त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतर होता. मी खोटं बोलणार नाही. स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे खूप कठीण आहे.
वाचा: 'आय वॉन्ट टु टॉक' चित्रपटामध्ये बदललेला दिसला अभिषेक बच्चन, पाहा ट्रेलर
राधिकाने असेही सांगितले की तिच्या पतीला आणि तिला मूल नको होते. पण तिला प्रेग्नंट असल्याचे दोन आठवड्यांनी समजले. त्यामुळे त्यांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात राधिकाचा पती तिच्यासोबत होता.