आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणेज राधिका आपटे. ती बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिकंली होती. तिची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. पण एक वेळ अशी आली होती की राधिकाची न्यूड क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. आज ७ सप्टेंबर रोजी राधिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी...
राधिकाने आजवर अनेक सीरिज आणि चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. तिला अनेकदा बोल्ड सीन्स देणारी अभिनेत्री म्हणून संबोधले जाते. एकदा तर तिची न्यूड क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे राधिकाने घराबाहेर पडणे बंद केले होते. तिने एका मुलाखतीमध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तिने या क्लिपमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाल्याचे सांगितले होते.
‘Clean, Shaven चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझी न्यूड क्लिप लीक झाली होती. त्यावेळी मला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. लोक किंवा मीडिया माझ्याविषयी काय बोलते याचा मी विचार केला. तसेच माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्टने जर ही व्हिडीओ क्लिप पाहिली तर ते माझ्याविषयी काय विचार करत असतील हे सतत माझ्या डोक्यात येत होते. मला अस्वस्थ व्हायला झाले होते. मला घराबाहेर पडताना डोक्यात खूप विचार येत होते. म्हणून मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली होती.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?
पुढे ती म्हणाली, ‘जे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये मी नाही असा अनेकांनी अंदाज लावला असेल. मला असे वाटत नाही की एखादी व्यक्ती असे करु शकेल किंवा करु ही शकते. या कडे दुर्लक्ष करायला हवे. याकडे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.’
संबंधित बातम्या