आर माधवनच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तो आणि सरिता नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. माधवनने आता खुलासा केला आहे की, जेव्हा त्याने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची पत्नी सुरुवातीला असुरक्षित होती. पण त्यानंतर काही आर्थिक निर्णयांमुळे त्यांच्या नात्यात स्थैर्य आले आणि म्हणूनच आज ते २५ वर्षे आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत. आता हा निर्णय काय होता चला जाणून घेऊया...
आर माधवनने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. 'मी अभिनेता म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात करत होतो आणि माझी चॉकलेट बॉय इमेज होती. मुलींना मी आवडत होतो. त्यामुळे असुरक्षितता निर्माण होते आणि ही असुरक्षितता वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण करण्यासाठी असते, हे आता मला कळाले आहे. मी माझ्या आई-वडिलांना विचारायचो की मी काय चुकीचे केले आणि ते म्हणायचे की आम्ही आमचे आयुष्य एकत्र घालवायचे ठरवले आहे, मग गोष्टी चुकत आहेत यावर विश्वास का ठेवायचा. आम्ही असे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की गोष्टी बरोबर होत आहेत. त्या दोघांचेही जॉइंट अकाऊंट आहे. मी म्हटले या गोष्टी खरच खूप महत्त्वाच्या ठरतात' असे आर माधवन म्हणाला.
पुढे माधवन म्हणाला, 'जेव्हा सरिताला असुरक्षित वाटते तेव्हा ती तिचे बँक खाते तपासते. दोघांनी एकत्र बसून पाहिले तर गोष्टी चांगल्या होतील. तसेच हे आपले जॉइंट अकाऊंट आहे आणि हे आपल्या दोघांचे आहे असे म्हणायला हवे. त्यानंतक तुम्ही म्हणू शकता की हे लग्न टिकू शकते. मला नेहमीच सरितावर विश्वास आहे. आशा आहे की तिचा पण माझ्यावर तेवढाच विश्वास आहे.'
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
माधवन अभिनेता होण्यापूर्वी कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग कोच होता. या स्कालमध्येच माधवन आणि सरिताची भेट झाली होती. सरिता एअर हॉस्टेस बनण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. एका मुलाखतीत सरिताने सांगितले होते की, "जेव्हा तिला पहिली नोकरी मिळाली तेव्हा मी आर माधवनला डिनर डेटसाठी विचारले होते. त्यानंतर आमचं प्रेम प्रकरण सुरु झाले." ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी १९९९ मध्ये आर माधवन आणि सरिताने लग्न केले. दोघांना एक मुलगा वेदांत माधवन आहे जो खूप प्रतिभावान आहे.
संबंधित बातम्या