बॉलिवूड अभिनेता आर माधवन, सैफ अली खान आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग २३ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात आहेत. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. चला जाणून घेऊया २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल में' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी...
'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट १९ ऑक्टोबर २००१ साली प्रदर्शित झाला होता. आता ३० ऑगस्ट २०२४ साली पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खरंतर २००१ मध्ये प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. मेकर्सनी हा चित्रपट डिस्ट्रीब्यूटर्सला विकला होता. यामुळे याचा फायदा टीमला झाला नाही. याशिवाय सुरुवातीला चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना फारसा प्रतिसाद मिळाल नव्हता.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास २०० सिनेमागृहांमध्ये 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी चित्रपटा च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. २३ वर्षांपूर्वी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४१ लाख रुपयांची कमाई केली होती.
'रहना है तेरे दिल में' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे जवळपास सर्वच शो हाऊसफूल आहेत. अभिनेता आर माधवने या संदर्भात स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार या कडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे.
वाचा : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील अभिनेत्याचे नवे गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर तुफान व्हायरल
खरं तर २००१ मध्ये प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. दिया मिर्झाने याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत “ रहना है तेरे दिल में ’ फ्लॉप झाल्यामुळे मला अनेक चित्रपटांमधून हटवण्यात आलं होतं” असं देखील सांगितलं होतं. त्यामुळे आता चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.