अभिनेता आर माधवन हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी त्याचा 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आर माधवनचे वजन हे वाढलेले दाखवण्यात आले होते. पण चित्रपटानंतर आर माधवन पुन्हा एकदम स्लिम-ट्रीम दिसला. आर माधवने इतक्या सहज वजन कसे कमी केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आर माधवनच्या फिटनेसचा सिक्रेट फंडा...
नुकताच आर माधवनला सोशल मीडियावर एका यूजरने वजन इतके कमी कसे कले असा प्रश्न विचारला होता. त्यावर आर माधवनने रिप्लाय देत शस्त्रक्रियेशिवाय, व्यायामाशिवाय वजन कमी कसे केले याचा फिटनेस फंडा सांगितला आहे.
कोणताही व्यायाम, धावणे किंवा शस्त्रक्रिया न करता आर माधवन २१ दिवसांत वजन कमी केले आहे. एका ट्विटर युजरने प्रश्न विचारला की, 'माधवनच्या शरीरात २१ दिवसांत इतके बदल कसे झाले?' यावर उत्तर देत माधवनने सांगितले की, 'मी आधूनमधून उपवास करायचो. अन्न हे जवळपास ४० ते ५० वेळा चावायचो.. भरपुर पाणी प्यायचो.. संध्याकाळी ६.४५ नंतर खाणे बंद केले होते. दुपारी ३ वाजल्यानंतर मी कच्चे काहीच खात नव्हतो. फक्त शिजवलेले अन्न. सकाळी लवकर उठून मी चालायला जात होतो. रात्री लवकर झोपायचो. झोपण्याआधी ९० मिनिटे स्क्रीन ऑफ करून ठेवायचो. भरपूर हिरव्या भाज्या खायचो. हे सर्व आरोग्यदायी पदार्थ तुमचे शरीर लवकरच पचवते. त्यामुळे वजन कमी होते.'
उपवास केल्याने अनेक सेलिब्रिटींचे वजन कमी झाले आहे. अलीकडे नेहा धुपियाची बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही चर्चेत होती. आपल्या जेवणातून साखर, तळलेले अन्न आणि ग्लूटेन असलेले पदार्थ खाणे तिने बंद केले होते. कधी कधी ती जिमला जायची. सकाळी ११ वाजता नाश्ता आणि संध्याकाळी ७ वाजता रात्रीचे जेवण करायची. नेहाने सांगितले की, वजन वाढल्यामुळे तिला प्रोफेशनल आणि पर्सनली खूप त्रास होत होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांनी व्यायाम आणि आहाराचे काटेकोरपणे पालन केले. फिट राहण्यासाठी संतुलित आणि निरोगी आहार घेण्यावर नेहाने भर दिला.
संबंधित बातम्या