R Madhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आर माधवनने घेतला जेवणाचा आस्वाद! म्हणाला...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  R Madhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आर माधवनने घेतला जेवणाचा आस्वाद! म्हणाला...

R Madhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आर माधवनने घेतला जेवणाचा आस्वाद! म्हणाला...

Published Jul 16, 2023 03:13 PM IST

R Madhavan Dinner With PM Modi: बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या डिनरला उपस्थिती लावली होती.

R Madhavan Dinner With PM Modi
R Madhavan Dinner With PM Modi

R Madhavan Dinner With PM Modi: अभिनेता आर माधवन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आर माधवन लवकरच ‘टेस्ट’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. नुकतेच आर माधवन याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आर माधवन पॅरिसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित होता.

बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या डिनरला उपस्थिती लावली होती. १४ जुलै २०२३ रोजी बॅस्टिल डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून लुव्रे म्युझियममध्ये या खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर या मेजवानीचे अनेक फोटो शेअर केले आहे. यासोबतच त्याने दोन्ही नेत्यांचे कौतुक करणारी एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे.

फोटोंसह आर माधवनने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने भारत-फ्रेंचमधील या मैत्रीपूर्ण संबंधांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे कौतुक केले आणि म्हटले की, ‘आपण एकमेकांबद्दल समान सकारात्मकता आणि आदर ठेवला पाहिजे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी उत्सुकतेने आमच्यासोबत सेल्फी घेतला. तर, आमचे माननीय पंतप्रधान अतिशय दयाळूपणे आणि गोडपणे त्याचा एक भाग होण्यासाठी उभे राहिले.’

या फोटोंमधील पहिल्या फोटोत आर माधवन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह जेवणाच्या टेबलावर बसलेला दिसला आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये, तीन वेळा ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या शेजारी त्यांच्यासोबत फोटो पोझ देताना दिसत आहे. १४ जुलै रोजी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या या खास शाही मेजवानीत 'जय हो' हे गाणे दोनदा वाजवण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पाहुणे या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसले.

Whats_app_banner