Madhavan Appointed FTII President : बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता आर माधवन याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. Film and Television Institute of India (FTII) चे अध्यक्षपद आर माधवनकडे सोपवण्यात आले आहे. साउथ सुपरस्टार आर माधवन याला नुकताच फिल्म रॉकेट्रीसाठी राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला होता.
ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ यावर्षी ३ मार्च रोजी संपल्यानंतर गेल्या पाच महिन्यापासून अध्यक्षपद रिक्त होते. शेखर कपूर यांनी नियुक्ती कोरोना काळात झाल्याने त्यांना विद्यार्थ्यांशी जास्त प्रत्यक्ष संवाद साधता आला आहे. तीन वर्षात अगदी मोजक्याच भेटी त्यांनी एफटीआयआयला दिल्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने पाच महिन्यानंतर एफटीआयआयच्या अध्यक्षपदासह नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची नियुक्ती केली आहे. एफटीआयआयचा अध्यक्ष हा एफटीआयआय सोसायटीचाही अध्यक्ष असतो.
अभिनेते आर. माधवन यांनी थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू, रंग दे बसंती, रहना है तेरे दिल में, सारख्या चित्रपटांद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेला व अभिनय केलेला ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटासाठी त्यांना गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या