छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'कुबूल है.' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री सूरभी ज्योती घराघरात पोहोचली. तिने या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता सूरभी तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूरभी कोणाशी लग्न करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अभिनेत्री सुरभी ज्योती आणि सुमित सुरी या वर्षी मार्चमध्ये लग्न करणार होते. मात्र, मार्च महिन्यात त्यांना राजस्थानमध्ये हवे असलेले ठिकाण लग्नासाठी न मिळाल्याने त्यांनी विवाहची तारीख पुढे ढकलली. आता सुरभीने निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत ठिकाणी लग्न करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तिने प्रसिद्ध असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका लक्झरी रिसॉर्टची निवड केली आहे. सूरभी २७ ऑक्टोबर रोजी लग्न करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नात अनेक अनोखे आणि पर्यावरणपूरक विधी होणार आहेत. जे शाश्वतता आणि निसर्गाप्रती त्यांची बांधिलकी दर्शविणार आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अंतराळाचे प्रतीक असलेल्या निसर्गाच्या विविध घटकांना या लग्नसोहळ्यात आदरांजली वाहण्यात येणार आहे. परंपरेचा आणि पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. तसेच इतर कार्यक्रमांचेही नियोजन करणयात आले आहे.
वाचा: बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी अभिनेत्रीने असे काही केले की पोलिसांनी केली अटक, वाचा काय झालं नेमकं?
सुरभी आणि सुमित अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत काम करत आहेत. त्यांनी पहिल्यांदा हांजी - द मॅरेज मंत्रा या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते. या व्हिडीओसाठी ते पहिल्यांदा भेटले होते. या व्हिडीओमध्ये ते वर आणि वधूच्या रुपात दिसले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रिअल लाईफ रोमान्समध्ये रुपांतरित झाली. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यावर सुरभी आणि सुमित लग्न करणार आहेत. त्यांचा विवाहसोहळा २७ ऑक्टोबला धूमधडाक्यात पार पडणार आहे. कुटुंबीय आणि काही मोजक्याच जवळच्या मित्रपरिवारासोबत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरभी ज्योती ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी पंजाबी चित्रपटांसह हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. झी टीव्हीवरील रोमँटिक मालिका कुबूल है मधील झोया फारुकीची भूमिका केल्यानंतर ती प्रसिद्ध झाली. या भूमिकेसाठी तिला भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.
संबंधित बातम्या