सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; 'पुष्पा २'च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; 'पुष्पा २'च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य

सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; 'पुष्पा २'च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 04, 2024 03:22 PM IST

Ram Gopal Varma: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत सर्वाधिक आहे. आता यावर राम गोपाल वर्मा यांनी वक्तव्य केले आहे.

Ram Gopal Varma
Ram Gopal Varma

'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फसिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली आणि मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दर २००० रुपयांपेक्षा जास्त ठेवले आहेत. या निर्णयावर टीका होत असतानाच चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी एक्स अकाऊंटवर तेलुगू भाषेत एक लांबलचक नोट लिहिली आणि तिकिटांच्या वाढलेल्या किंमतींबद्दल 'रडणाऱ्या' लोकांवर त्यांच्या ट्रेडमार्क शैलीत टीका केली. करमणूक उद्योग आणि लक्झरी मार्केट यांच्यातील साम्यही त्यांनी सांगितली आहे. सध्या सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा यांची पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे राम गोपाल वर्मा यांची पोस्ट?

राम गोपाल वर्मा यांनी पोस्टमध्ये इडली हॉटेलचा उल्लेख केला आहे. "सुब्बाराव नावाच्या एका व्यक्तीने इड लीहॉटेल थाटले आणि प्रति प्लेट १००० रुपये घेतले. कारण सुब्बारावांना आपली इडली इतर इडलींपेक्षा चांगली वाटते. परंतू, ग्राहकाला सुब्बारावांची इडली योग्य वाटली नाही, तर ते त्यांच्या हॉटेलमध्ये जाणार नाहीत. या परिस्थितीत पराभूत होणारे सुब्बाराव हे एकमेव आहेत. सुब्बारावांची इडली सर्वसामान्यांना परवडणारी नाही अशी ओरड करणारे मूर्ख आहेत. कारण 'सेव्हन स्टार हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे नाही' असे म्हणण्यासारखे आहे. असेही आर. जी. व्ही. 'सेव्हन स्टार हॉटेलच्या वातावरणासाठी पैसे देत आहात, असा युक्तिवाद केला जात असेल. तर पुष्पा २ च्या बाबतीत सेव्हन स्टार क्वालिटी हा चित्रपट आहे" असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "लोकशाही भांडवलशाही वर्गभेदावर काम करते' आणि चित्रपट लोकसेवेसाठी नव्हे, तर नफ्यासाठी बनवले जातात. लक्झरी कार, इमारती आणि ब्रँडेड कपड्यांच्या किमतीवरून कुणी रडत नाही, तर सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला? करमणूक आवश्यक आहे का? घरे, अन्न, कपडे यापेक्षा ही गोष्ट अधिक आवश्यक आहे का?" असा सवाल राम गोपाल वर्मा यांनी केला आहे.

"आपण सुब्बारावांच्या हॉटेलकडे परत येऊया. इडलीची किंमत किती असली तरी चालली आहे. याचा पुरावा म्हणजे सुब्बारावांच्या हॉटेलमध्ये बसायलाही जागा मिळत नाही- सगळ्या सीट बुक झालेल्या असतात!" असे ते पुढे म्हणाले.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक

पुष्पा २ : द रूल सिनेमाविषयी

पुष्पा २ : द रूलच्या टीमने जाहीर केले की चित्रपटाने जगभरात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकट्या अमेरिकेत प्री-सेल्समध्ये २.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. पुष्पा 2: द रूल हा सुकुमारच्या 2021 मधील पुष्पा : द राइज या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अर्जुनने साकारलेल्या पुष्पा राज या लाल चंदन तस्करी करणाऱ्या तरुणाची कथा होती.रश्मिका आणि फहाद यांनी त्याची पत्नी श्रीवल्ली आणि कट्टर प्रतिस्पर्धी भंवर सिंग शेकावत यांची भूमिका साकारली आहे.

Whats_app_banner