Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या

Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 05, 2024 12:42 PM IST

Pushpa 2 The Rule review: अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणारा 'पुष्पा २' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने तुफान कमाई केली आहे. पण या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा आहे चला जाणून घेऊया...

Pushpa 2 The Rule review
Pushpa 2 The Rule review

दिग्दर्शक सुकुमारन यांच्या 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पण पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये नेमकं असणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा पुष्पराज आणि त्याचा ३ तास २० मिनिटाचा प्रवास प्रेक्षकांना खुर्चीत खिळवण्यात यशस्वी झाला आहे. कारण पुष्पराज हा लहान असताना झालेल्या जखमांना खतपाणी घालत असतो. चित्रपट पाहताना कधी तुम्हाला हसू येईल, तर कधी तुम्ही भावूक व्हाल. चला तर मग जाणून घेऊया 'पुष्पा 2: द रूल' चित्रपटाचा रिव्ह्यू...

काय आहे चित्रपटाची कथा

पुष्पा : द राइज हा सिनेमा जेथे संपतो तेथून पुढे 'पुष्पा 2: द रूल' हा सिनेमे सुरु होतो. पुष्पराज आता मोठ्या प्रमाणावर लाल चंदनाची तस्करी करत आहे. तो त्याची प्रेमळ पत्नी श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) आणि त्याची आई (कल्पलता) यांच्यासोबत एका आलिशान बंगल्यात राहतो. तो आता महागडे शर्ट, सोन्याचे दागिने आणि आर्थिक स्थिती चांगली असल्याचे लक्षण म्हणून नखांना लाल नेल पेंट लावताना दिसतो. चित्तूरचा बहुतेक भाग हा त्याच्या तालावर नाचत असतो. कारण, पुष्पराज जे काही पैसे कामवतो ते गावकऱ्यांनाही वाटत असतो.

पुष्पराजच्या आयुष्यात दोन काटे आहेत. एक म्हणजे त्याचा सावत्र भाऊ मोहन राज. हा पुष्पराजला बेकायदेशीर धंदा करत असल्याची किंवा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाही. दुसरा एसपी भंवर सिंग शेकावत (फहाद फासिल) आहे. त्याचा अहंकार सर्वांनी पाहिला आहे. तसेच त्याच्यासोबत भेदभाव होताना दिसले आहे. त्याने काहीही केले तरी त्याला योग्य तो सन्मान ही देत नाही. पण प्रत्युत्तर न देता तो बदला घेण्याचा ठरवते.

Rashmika Mandanna and Allu Arjun
Rashmika Mandanna and Allu Arjun

पुष्पा २ : द रूल, सुकुमार यांनी पुष्पा : द राइज मध्ये दुर्लक्षित केलेल्या काही त्रुटी दुरुस्त केल्या आहेत. केवळ स्वत:साठी आणि आपल्या आईच्या आदरासाठी पुष्पराज झटत असतो. त्याच्या लहानपणी झालेला अपघात हा या चित्रपटाचा केंद्रबिंदु आहे. बेकायदेशीर सिंडिकेट चालवताना पुष्प राज आनंदी असतो. पण जेव्हा पुष्पराज जे काही करत आहे त्यामागचे कारण कळाल्यावर माहिती समोर येते. तसेच भंवर आणि पुष्कराज यांच्यामधील वाद हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चित्रपटात पुढे काय होणार याकडे त्यांचे लक्ष असते.

चित्रपटाची सुरुवात चांगली होते, पूर्वार्धात पहिल्या भागातील अनेक गोष्टींचे कनेक्शन जाणवते. श्रीवल्लीनं पुष्पाला काहीतरी विचारलं आहे आणि त्याने कितीही वाटा उचलला तरी त्याने ते साध्य करावं अशी तुमची इच्छा आहे. पण उत्तरार्धात हा चित्रपट थोडा डळमळीत होतो. आपण आपले डोके चोळायला सुरुवात करतो. विचार करतो की चित्रपटाची कथा भरकटत तर नाही ना. पण शेवटी कथा पटापट पुढे सरकत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची हिंटही देऊन जाते.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका

अर्जून आणि रश्मिकाच्या अभिनयाविषयी

अल्लू अर्जुनने पुष्पा या चित्रपटांसाठी गेली पाच वर्षे घालवली आहेत. त्याने या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे दिसत आहे. त्याचा अभिनय पाहण्यासारखा आहे. पुष्पराजला सांभाळण्यासाठी श्रीवल्ली आहे. दुर्दैवाने, श्रीवल्ली हा संदीप रेड्डी वनगा यांच्या अॅनिमलमधील गीतांजलीचा विस्तार असल्याचे दिसते. ती वेडी झाल्यावर ओरडते, चिडचिड करते, जेवण फेकून देते, आनंदी असताना आपल्या पुरुषाचा प्रचार करते. पण अयोग्य वेळी हातात लाटणे घेऊन त्याच्या मागे फिरते. पण त्यापलीकडे काहीच नाही. सुदैवाने, श्रीवल्लीला तिच्या पतीचा बचाव करण्यासाठी एक चांगला मोनोलॉग मिळतो.

Whats_app_banner