Pushpa 2 Box Office Collection Day 3: 'पुष्पा २' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 Box Office Collection Day 3: 'पुष्पा २' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?

Pushpa 2 Box Office Collection Day 3: 'पुष्पा २' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?

Dec 07, 2024 10:57 PM IST

Pushpa 2 Box Office Collection : मीडिया रिपोर्टनुसार, पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात ३७९.२८ कोटी रुपये कमावले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'पुष्पा २' दिवसेंदिवस जबरदस्त कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर याची क्रेझ दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर पुष्पा २ ची क्रेझ
बॉक्स ऑफिसवर पुष्पा २ ची क्रेझ

Pushpa 2 The Rule box office collection day 3 : 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाने सर्वांना वेड लावलं असून जगभरात याची क्रेझ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या जबरदस्त ॲक्शन सीनने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.  सुकुमारच्या अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फसिल अभिनीत पुष्पा २: द रूल चा ओपनिंग डे जबरदस्त होता. मात्र  बॉक्स ऑफिसवर दुसरा दिवस फारसा चांगला नव्हता. असे असले तरी चित्रपटाच्या टीमच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींची कमाई केली आणि पुष्पा : द राइज या पहिल्या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनचा टप्पा ओलांडला. 

मीडिया रिपोर्टनुसार, पुष्पा २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात ३७९.२८ कोटी रुपये कमावले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'पुष्पा २' दिवसेंदिवस जबरदस्त कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर याची क्रेझ दिसत आहे. 'Sacnilk. com. च्या म्हणण्यानुसार पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३७९.२८ कोटींची कमाई केली आहे. 

पुष्पा २ चित्रपटाची तिसऱ्या दिवसांची कमाई -

पुष्पा २: द रूल' या चित्रपटाने ४ डिसेंबर रोजी भारतात प्रीमिअर दरम्यान १०.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १६४.५ कोटी रुपये आणि पहिल्या शुक्रवारी ९३.८ कोटी रुपयांची कमाई केली. कलेक्शनमध्ये ४२.८९ टक्क्यांची घसरण झाली असली तरी शुक्रवारी या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला.

शनिवारी या चित्रपटाने भारतात सुमारे ११०.५८ कोटी रुपयांची कमाई केली आणि शुक्रवारच्या कलेक्शनला मागे टाकत एकूण ३७९.२८ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारअखेरपर्यंत चित्रपटाने किती कलेक्शन केले हे पाहुया -

दिवस 0 + 1१०.६५ कोटी + १६४.५ कोटी रुपये निव्वळ
दुसरा दिवस९३.८ कोटी रुपये
तिसरा दिवस११०.५८ कोटी रुपये (अंदाज)
संपूर्ण३७९.२८ कोटी रुपये

पुष्पा २ : द रूलने मोडले विक्रम -

पहिल्याच दिवशी 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटाचे विक्रम मोडले. राजामौली यांच्या 'आरआरआर'ला मागे टाकत या चित्रपटाने अव्वल स्थान पटकावले असून कोणत्याही भारतीय चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग आहे. हिंदी चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्यासाठी अॅटलीच्या जवानलाही मागे टाकले. एकाच दिवशी दोन भाषांमध्ये ५० कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाने प्रथम क्रमांकाची नोंद केली. पुष्पा २ : द रूल हा अर्जुनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असून वीकेंडला आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner