Pushpa 2 Collection : बॉक्स ऑफिसवरही फायर ठरला ‘पुष्पा २’! सर्वाधिक कमाई करून रचणार ‘हा’ विक्रम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 Collection : बॉक्स ऑफिसवरही फायर ठरला ‘पुष्पा २’! सर्वाधिक कमाई करून रचणार ‘हा’ विक्रम

Pushpa 2 Collection : बॉक्स ऑफिसवरही फायर ठरला ‘पुष्पा २’! सर्वाधिक कमाई करून रचणार ‘हा’ विक्रम

Dec 10, 2024 04:00 PM IST

Pushpa 2 Collection Day 5 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाने आणखी एक विक्रम रचला आहे. ‘पुष्पा २’ हा जगभरात सर्वात जलदगतीने ९०० कोटींचा टप्पा ओलांडणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

पुष्पा 2
पुष्पा 2

Pushpa 2 : The Rule Box Office Collection Day 5 :  अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २ : द रूल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले होते आणि आता ‘पुष्पा २’ ने आणखी एक विक्रम केला आहे. या चित्रपटाने ५ दिवसांत जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. हा एक मोठा विक्रम ठरणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विट करत म्हटलं की, 'पुष्पा २ : द रूल'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यानंतर त्यांनी ट्विट केले की, २०२४मध्ये ‘पुष्पा २’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा २’ या चित्रपटाने आग लावली आहे. सगळीकडे ‘पुष्पा २’चा बोलबाला पाहायला मिळत आहे.

‘पुष्पा २’ची हवा!

‘पुष्पा’ या चित्रपटच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून असेही ट्विट करण्यात आले आहे की, ‘पुष्पा २ हा सर्वात जलद गतीने कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे, ज्याने जगभरात अवघ्या ४ दिवसांत ८०० कोटींची कमाई केली आहे.’ या पेजवरून चित्रपटाचा ४ दिवसांचा हा विक्रम शेअर करण्यात आला आहे.

सर्वात जलद ३०० कोटी रुपये कमावणारा हिंदी चित्रपट! 

चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले की, ‘पुष्पा २ हा हिंदी भाषेत ३०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. ’पुष्पा २'ने भारतात हिंदी भाषेत ५ दिवसांत ३०० कोटींची कमाई केली. या आधी ‘जवान’ हा चित्रपट ६ दिवसांत ३०० कोटींमध्ये सामील झाला होता. ‘पठान’ने ७ दिवसांत, ‘अॅनिमल’ ७ दिवसांत, ‘गदर २’ ८ दिवसांत, ‘स्त्री २’ ८ दिवसांत, ‘बाहुबली २’ने १० दिवसांत हिंदी, ‘केजीएफ २’ हिंदीमध्ये ११ दिवसांत आणि ‘दंगल’ने १३ दिवसांत ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.'

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटात पुष्पा राजच्या भूमिकेत अल्लू अर्जुन तर श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकले आहेत. या दोन स्टार्सशिवाय फहाद फासिलदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून, खलनायक म्हणूनही त्याला चांगलीच पसंती मिळत आहे.

Whats_app_banner