Pushpa 2 : अखेर ‘पुष्पा २’ने ‘बाहुबली २’लाही टाकलं मागे! अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 : अखेर ‘पुष्पा २’ने ‘बाहुबली २’लाही टाकलं मागे! अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम

Pushpa 2 : अखेर ‘पुष्पा २’ने ‘बाहुबली २’लाही टाकलं मागे! अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम

Dec 23, 2024 08:05 AM IST

Pushpa 2 BO Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २ द रूल' दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त कमाई करताना पहायला मिळत आहे.

पुष्पा 2 द रूल
पुष्पा 2 द रूल

Pushpa 2 BO Collection Day 18 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ द रूल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी पुन्हा एकदा चांगलीच पसंत केली जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी या चित्रपटाने इतिहास रचला. अल्लूचा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या १८व्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाने आतापर्यंत किती बिझनेस केला आहे... 

छप्परफाड कमाई!

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २ द रूल' दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त कमाई करताना पहायला मिळत आहे. ‘पुष्पा २’ने हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटाने एकट्या हिंदीत १८ दिवसांत ६७९.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यूमधून या चित्रपटाने १०.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १६४.२५ कोटींची कमाई करत अनेक मोठे विक्रम मोडले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा २'ने १८व्या दिवशी ३३.२५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत या चित्रपटाने १०६२.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Pushpa 2 : माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत! अल्लू अर्जुन पहिल्यांदाच 'त्या' घटनेवर बोलला

‘बाहुबली २’चा विक्रम मोडला! 

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली २'चा विक्रम मोडला आहे. 'बाहुबली २' प्रदर्शित होऊन ७ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट आतापर्यंत भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. भारतात सर्व भाषांमध्ये मिळून त्याची उलाढाल १०३०.४२ कोटी रुपये होती. तर 'पुष्पा २' या चित्रपटाने १०६२.९ कोटी रुपयांची कमाई करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

पुष्पा २ कलेक्शन

० दिवस - १०.६५ कोटी

१ दिवस - १६४.२५ कोटी

२ दिवस - ९३.८ कोटी

३ दिवस - ११९.२५ कोटी

४ दिवस - १४१.०५ कोटी

५ दिवस - ६४.४५ कोटी

६ दिवस - ५१.५५ कोटी

७ दिवस - ४३.३५ कोटी

८ दिवस - ३७.४५ कोटी

९ दिवस - ३६.४ कोटी

१० दिवस - ६३.३ कोटी

११ दिवस - ७६.६ कोटी

१२ दिवस - २६.९५ कोटी

१३ दिवस - २३.३५ कोटी 

१४ दिवस - २०.५५ कोटी

१५ दिवस - १७.६५ कोटी

१६ दिवस - १४.३ कोटी 

१७ दिवस – २४.७५ कोटी

१८ दिवस – ३३.२५ कोटी

एकूण कलेक्शन – १०६२.९ कोटी

Whats_app_banner