Pushpa 2 BOx Office Collection Day 11 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा २ द रूल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याचा हा चित्रपट ५ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी पुन्हा एकदा चांगलीच पसंत केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला भरभरून प्रेम मिळालं. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक बड्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हिंदी सिनेमाच्या या चित्रपटाने इतिहास रचला आहे. अशातच आता चित्रपटाच्या ११व्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. चला तर, मग जाणून घेऊया शनिवारी या चित्रपटाने किती बिझनेस केला?
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा : द राइज' हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. तर, दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'पुष्पा २ : द रूल' प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटाची क्रेझ आज दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा २’ने हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. 'पुष्पा २ द रूल'ने दहा दिवसांत एकट्या हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यूमधून या चित्रपटाने १०.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने ओपनिंग डे म्हणजेच गुरुवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर १६४.२५ कोटी रुपयांची कमाई करत अनेक मोठे विक्रम मोडले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा २'ने रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत ९००.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
० दिवस - १०.६५ कोटी
१ दिवस - १६४.२५ कोटी
२ दिवस - ९३.८ कोटी
३ दिवस - ११९.२५ कोटी
४ दिवस - १४१.०५ कोटी
५ दिवस - ६४.४५ कोटी
६ दिवस - ५१.५५ कोटी
७ दिवस - ४३.३५ कोटी
८ दिवस - ३७.४५ कोटी
९ दिवस - ३६.४ कोटी
१० दिवस - ६३.३ कोटी
११ दिवस - ७५ कोटी
एकूण कलेक्शन - ९००.५ कोटी