Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या कमाईत वाढ, १०व्या दिवशी छप्पर फाड कमाई
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या कमाईत वाढ, १०व्या दिवशी छप्पर फाड कमाई

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या कमाईत वाढ, १०व्या दिवशी छप्पर फाड कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 15, 2024 07:43 AM IST

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या नुकत्याच झालेल्या अटकेमुळे त्याच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर जराही फरक पडताना दिसत नाही. उलट चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे.

Pushpa 2
Pushpa 2

पुष्पा २ : द रूल या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर अल्लू अर्जुनची जामीनावर सुटका करण्यात आली. पण सगळ्याचा अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ : द रूल या सिनेमाच्या कमाईवर काहीही फरक पडतनाना दिसला नाही. उलट चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया चित्रपटाने प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी एकूण किती कमाई केली आहे.

पुष्पा 2: द रूल बॉक्स ऑफिस

Sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने भारतात ८२० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी सुमारे ६० कोटी रुपयांची कमाई केली आणि दहा दिवसांची कमाई भारतात अंदाजे ८२२.२० कोटी रुपये केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्याचे कलेक्शन ७२५.८ कोटी रुपये केले असून प्रीमिअरदरम्यान १०.६५ कोटी रुपये कमावले. तसेच जगभरात पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

या चित्रपटाने पहिल्या शुक्रवारी ९३.८ कोटी रुपयांची कमाई केली, परंतु वीकेंडमध्ये या चित्रपटाने ११९.२५ कोटी कमाई केली. तसेच शनिवार आणि रविवारी मिळून १४१.०५ कोटी रुपयांची कमाई केली. आठवडाभरात या चित्रपटाने ६४.४५ कोटी, ५१.५५ कोटी ४३.३५ कोटी आणि ३७.४५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने ३६.४ कोटींची कमाई केली. चित्रपटाने आता पर्यंत एकूण ८२० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनला अटक झाल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कार?

अल्लू अर्जुनला अटक

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. ४ डिसेंबर ला अल्लू अर्जुन चाहत्यांसोबत आपला पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, चेंगराचेंगरी होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला.

१३ डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. त्यानंतर त्याला नामपल्ली फौजदारी न्यायालयात नेण्यात आले. येथे त्याला १४ दिवसांच्या रिमांडवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतरही अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनला तुरुंगात कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नाही.

Whats_app_banner