Pushpa 2 : 'पुष्पा २'नं बॉक्स ऑफिसवरही लावली आग! ठरला ‘इतक्या’ कोटींची कमाई करणार पहिला चित्रपट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 : 'पुष्पा २'नं बॉक्स ऑफिसवरही लावली आग! ठरला ‘इतक्या’ कोटींची कमाई करणार पहिला चित्रपट

Pushpa 2 : 'पुष्पा २'नं बॉक्स ऑफिसवरही लावली आग! ठरला ‘इतक्या’ कोटींची कमाई करणार पहिला चित्रपट

Dec 26, 2024 08:45 AM IST

Pushpa 2 Collection : ‘पुष्पा २’ने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अनेक वादांमध्येही या चित्रपटाची कमाई इतकी जबरदस्त आहे की, ‘पुष्पा २’ने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे.

पुष्पा 2
पुष्पा 2

Pushpa 2 Box Office Collection : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात जात आहेत आणि त्यामुळेच तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट भरपूर कमाई करत आहे. या दरम्यानच्या काळात आणखी अनेक सिनेमे प्रदर्शित झाले, पण त्यांचा ‘पुष्पा २’च्या फायरवर परिणाम झाला नाही आणि म्हणूनच तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ हा भारतात ११०० कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. तिसऱ्या बुधवारी या चित्रपटाने १९.७५ कोटींची कमाई केली आहे, तर वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपटही २५ तारखेला प्रदर्शित झाला आहे. एकट्या हिंदी भाषेत या चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे. ‘पुष्पा २’ची बुधवारीची कमाई मंगळवारच्या तुलनेत बरीच जास्त आहे. या चित्रपटाला ख्रिसमसचा फायदा झाला असून, आतापर्यंत या चित्रपटाने एकूण भारतात ११०९.८८ कोटींची कमाई केली आहे.

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार। आता अभिनेत्यावर पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

अल्लू अर्जुन अडकलाय वादात 

एकीकडे ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घळतोय. तर, दुसरीकडे ‘पुष्पा २’चा स्टार अभिनेता अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण, असं असूनही त्याचा सिनेमाच्या कमाईवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लूला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला. मात्र,  हा जामीनाचा निर्णय उशिरा आल्याने अभिनेत्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. 

मंगळवारीही अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अल्लू अर्जुनला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन याला चेंगराचेंगरीत अडकलेल्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ पाहून अभिनेता भावूक झाला होता. आता अल्लू अर्जुन याने पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, ‘पुष्पा २’च्या टीमने पीडित कुटुंबाला मदत म्हणून २ कोटी रुपये दिले आहेत. अल्लू अर्जुनने स्वतः १ कोटी रुपये, मैत्री मूव्ही मेकर्सकडून ५० लाख रुपये आणि चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्याकडून ५० लाख रुपयांची मदत या कुटुंबाला देण्यात आली आहे.

Whats_app_banner