मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2 OTT Release: थिएटरआधीच ‘पुष्पा २’चं ओटीटी रिलीज जाहीर! पाहा कुठे आणि कधी बघता येणार चित्रपट

Pushpa 2 OTT Release: थिएटरआधीच ‘पुष्पा २’चं ओटीटी रिलीज जाहीर! पाहा कुठे आणि कधी बघता येणार चित्रपट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 17, 2024 08:17 AM IST

Pushpa 2 OTT Release Details: ‘पुष्पा २’ आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीजपूर्वीच ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे.

Pushpa 2 OTT Release Details
Pushpa 2 OTT Release Details

Pushpa 2 OTT Release Details: साऊथ सुपरस्टार अर्थात अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा २’मुळे प्रचंड चर्चेत आहे. प्रेक्षक आणि चाहतेही अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. तर, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी देखील चाहते खूप उत्सुक आहेत. ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे. पण, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीजपूर्वीच ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. ‘पुष्पा २’ आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहे. ‘पुष्पा २’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या पोस्टमध्ये ‘पुष्पा २’च्या पोस्टरसह कॅप्शन लिहिले आहे की, 'पुष्पा २ लवकरच नेटफ्लिक्स हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये बघता येणार आहे’. मात्र, हा चित्रपट नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला ओटीटीवर रिलीज होणार, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Esha Deol Divorce: हेमा मालिनीची लेक पतीपासून विभक्त होणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण!

‘पुष्पा १’ हा चित्रपट २०२१मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. तर, साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने या चित्रपटात एक आयटम साँग केले होते, जे खूप लोकप्रिय झाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती. ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३७३ कोटींची कमाई केली होती.

‘पुष्पा १’ या चित्रपटाचे एवढे यश पाहून, मेकर्सनी लगेचच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. 'पुष्पा २'चा दुसरा भाग म्हणजेच 'पुष्पा द रूल' यावर्षी १५ ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरलाही प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. चित्रपटाची ही छोटीशी झलक पाहिल्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटातही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'पुष्पा २' या चित्रपटाची अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची टक्कर होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

WhatsApp channel

विभाग