अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनीत 'पुष्पा २: द रूल' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली होती. आता हिंदी भाषेतील सिनेमा कुठे आणि कधी पाहायला मिळणार याविषयी माहिती समोर आली आहे.
बुधवारी नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. तसेच हा टीझर शेअर करत हिंदी भाषेतील सिनेमा ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
नेटफ्लिक्स इंडियाने पुष्पा २ सिनेमाच्या ओटीटी रिलिजची घोषणा करत, 'पुष्पा भाऊ ने सुन ली आपकी बात, अब पुष्पा का रूल, हिंदी में भी. पाहा पुष्पा २- नेटफ्लिक्सवर २३ मिनिटांच्या अतिरिक्त फुटेजसह रिलोडेड व्हर्जन, ३० जानेवारीला हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत!' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: उषा नाडकर्णी की तेजस्वी प्रकाश; सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये कोण घेतं सर्वाधिक फी?
पुष्पा २ : द रूल या चित्रपटाची कथा पुष्पा : द राइजचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात पुष्पा राज रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारापासून लाल चंदनाची स्वत:ची तस्करीची टोळी कशी चालवते हे दाखवण्यात आले आहे. रश्मिकाने त्याची पत्नी श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे, जी त्याच्या विभक्त कुटुंबाविरोधात त्याच्यासाठी उभी राहते. पुष्पा : द राइज या चित्रपटात फहाद ने पोलीस अधिकारी भंवर सिंग शेकावत ची भूमिका साकारली आहे, जो अजूनही अपमानाला सामोरे जात आहे.
संबंधित बातम्या