Pushpa 2 Box Office Collection : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आता १००० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाने ९५० कोटींची कमाई केली होती. पण, आता एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यात चित्रपटाने १००० कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले आहे.
खरं तर, ‘पुष्पा २’ने चित्रपटाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट रिट्विट केली आहे, ज्यात म्हटले आहे की, 'पुष्पा २' ने ६ दिवसांत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. असे म्हटले जात आहे की, ‘पुष्पा २’ सर्वात जलद गतीने १००० कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
‘पुष्पा २’ हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करत आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या अहवालानुसार चित्रपटाच्या कमाईत किंचित घट होणार आहे. पण, असं असूनही हा सिनेमा आपलं नाव कमावणार आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी हा चित्रपट ६०-६५ कोटींची कमाई करेल. सोमवारच्या कमाईच्या तुलनेत मंगळवारी हा व्यवसाय १५ ते २० टक्क्यांनी घसरणार आहे.
मंगळवारीही ‘पुष्पा’च्या अधिकृत पेजवर अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, जिथे मंगळवारी रात्रीच्या शोजमध्ये थिएटरबाहेर गर्दी दिसून येत आहे. एक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर येत आहे. कुणीतरी लिहिलं, 'नो फ्रायडे, नो वीकेंड, मंगळवारी सिनेमा बघायला येत आहे.' ‘सुट्टी नाही, आम्ही सगळे पुष्पाला भेटायला येत आहोत.’ प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर समीक्षकांचा ही प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळाला.
सुकुमार दिग्दर्शित आणि मैथरी मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत या भूमिका साकरल्या आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. सुकुमार दिग्दर्शित पुष्पाच्या पहिल्या भागात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.