Pushpa 2 The Rule Box Office Collection Day 8 : ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची हवा जोरदार सुरू आहे. गेल्या गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर हा चित्रपट कमाईच्या बाबतीत मंदावण्याची किंवा घट होण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये तब्बल ३७.९ कोटी रुपयांची कमाई केली आणि यानंतर त्याची देशांतर्गत एकूण कमाई ७०० कोटींच्या पुढे गेली.
सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २: द रूल’ने रिलीजच्या आठव्या दिवशी ३३ कोटी कमावले, ज्यामुळे आता या चित्रपटाच्या एकूण कालेक्शनच्या ८ दिवसांचा आकडा ७२६.२५ कोटी झाला आहे. भारतातील कोणत्याही चित्रपटाचे हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक कलेक्शन आहे आणि ‘पुष्पा २’ केवळ आठवडाभरात हा विक्रम केला आहे.
'पुष्पा १ : द राइज' या चित्रपटाप्रमाणेच ‘पुष्पा २’च्या कमाईचा मोठा वाटा हिंदी-डब व्हर्जनमधून आला आहे. सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ४२५.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे, जी मूळ तेलुगू आवृत्तीने कमावलेल्या २४१.९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तमिळ, कन्नड आणि मल्याळम आवृत्तींनीही अनुक्रमे ४१ कोटी, ५.३५ कोटी आणि १२.४ कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाला जगभरात पोहोचवले आहे. देशातच नव्हे, तर जगभरात या चित्रपटाची किती क्रेझ आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा २ : द रूल’ सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा गँगस्टर पुष्पा राजच्या भूमिकेत दिसला आहे. तो पुन्हा त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी भैरों सिंह शेखावतशी (फहाद फासिल) भिडतो. या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. ‘पुष्पा २’ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत १६५ कोटी आणि जगभरात २९४ कोटी रुपयांची कमाई करत भारतीय चित्रपटाची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट ओपनिंग नोंदवली. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला असून, आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १० भारतीय चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला आहे.
संबंधित बातम्या