Record Breaking Pushpa 2 Advance Booking : अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, सिनेमाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरू करण्यात आले आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात कमाल करणार असल्याचे अॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने जगभरात प्री-सेल्सच्या बाबतीत ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
ट्रेंड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग उघडल्यानंतर ४८ तासांच्या आत (०१ डिसेंबर, संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत) पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगने २५ कोटींचा टप्पा ओलांडला. या आगाऊ बुकिंगमध्ये हिंदी तिकिटांचा वाटा ५० टक्के आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने ओपनिंग डेला अॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या बाबतीत ‘पठान ’, ‘केजीएफ २’ आणि ‘गदर २’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे.
‘पुष्पा २’ या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाल्यानंतर १२ तासांच्या आत ओपनिंग डे बुकिंगसाठी तीन लाख तिकिटे विकली गेली. तर, या आधी अॅडव्हान्स बुकिंग उघडल्यानंतर १२ तासांच्या आत शाहरुखच्या सिनेमाची २ लाख तिकिटे विकली गेली होती. शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता.
२०२२मध्ये रिलीज झालेल्या ‘केजीएफ २’च्या हिंदी डब व्हर्जनने आगाऊ बुकिंगच्या पहिल्या २४ तासांत १.२५ लाख तिकिटे विकली होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने पहिल्या २४ तासांत (०१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत) १.८ लाख तिकिटे विकली आहेत. अशाप्रकारे अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने 'केजीएफ २'चा विक्रमही मोडला आहे.
तर, ‘गदर २’ने आगाऊ बुकिंगच्या पहिल्या २४ तासांत १.१० लाख तिकिटे विकली होती. तर, अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खळबळ माजवत आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली'च्या अॅडव्हान्स बुकिंगचा विक्रमही हा चित्रपट मोडू शकतो, असे मानले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, बाहुबलीने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ९० कोटींची कमाई केली होती.
‘पुष्पा २’ अशीच कमाई करत राहिला, तर पहिल्याच दिवशी (अॅडव्हान्स बुकिंग) १०० कोटींची कमाई करणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या