Musafiraa Trailer: प्रेम आणि मैत्रीचा सुंदर प्रवास; 'मुसाफिरा'चा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Musafiraa Trailer: प्रेम आणि मैत्रीचा सुंदर प्रवास; 'मुसाफिरा'चा ट्रेलर प्रदर्शित

Musafiraa Trailer: प्रेम आणि मैत्रीचा सुंदर प्रवास; 'मुसाफिरा'चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2024 12:27 PM IST

Pushkar Jog upcoming movie: अभिनेता पुष्कर जोग 'मुसाफिरा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Musafiraa Trailer
Musafiraa Trailer

आजकाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येताना दिसत आहेत. लवकरत 'मुसाफिरा' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

‘मुसाफिरा’ या चित्रपटात पाच मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी चाहत्यांना चित्रपट पाहावा लागणार आहे.
वाचा: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोगने केले आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, "मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे."

Whats_app_banner