तुमच्या चड्डीत सुतळी बॉम्ब टाकेन! दिवाळीत प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना मराठी अभिनेत्याचा इशारा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुमच्या चड्डीत सुतळी बॉम्ब टाकेन! दिवाळीत प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना मराठी अभिनेत्याचा इशारा

तुमच्या चड्डीत सुतळी बॉम्ब टाकेन! दिवाळीत प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना मराठी अभिनेत्याचा इशारा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 01, 2024 01:48 PM IST

सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याची एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने पाळीव प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

Diwali Celebration
Diwali Celebration

सध्या संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. सगळीकडे दिव्यांची रोशणाई केल्याचे दिसत आहेत. तसेच अनेकजण उत्साहात फटाके फोडताना दिसत आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आनंदाने दिवाळीतील फटाके, रांगोळी, रोषणाई, फराळाचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेषतः मोठमोठे फटाके फोडत हा आनंद रोषणाईत, आतिषबाजीमध्ये द्विगुणित केला जातो. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांचा होतो त्रास

दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आवाजामुळे वयोवृद्ध माणसांना त्रास होतो. तसेच पाळीव प्राण्यांना देखील त्रास होतो. काही वेळा तर गंमत म्हणून दिवाळीत काहीजण पाळीव प्राण्यांच्या जीवाशी खेळतानाही दिसतात. कुत्र्याच्या शेपटीजवळ फटाके लावून त्याला त्रास देणं, एखादा कुत्रा झोपला असेल तर त्याला उठवण्यासाठी त्याच्या शेजारी फटाके लावणं अशा अनेक घटना घडताना दिसतात. मात्र या घटना घडू नयेत यासाठी एका मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट केली आहे.

अभिनेत्याने दिली ताकीद

फटाके फोडल्यावर रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या जनावरांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच या सगळ्याची काळजी घेण्यासाठी एका मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्राण्यांना जर फटाक्यांनी त्रास दिला तर त्या व्यक्तीला देखील त्रास देईन असे पुष्कर जोगने म्हटले आहे.
वाचा: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली

काय आहे अभिनेत्याची पोस्ट?

पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. “जर कोणी मला कुत्र्यांच्या शेपटीजवळ फटाके लावताना दिसलात, तर मी स्वत: येऊन तुमच्या चड्डीच्या आत सुतळी बाँब टाकेन. कृपया अशी विकृती करु नका. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, ते फार घाबरतात. #जोगबोलणार” असे पुष्करने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Whats_app_banner