मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushkar Jog: "२ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

Pushkar Jog: "२ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 07:18 AM IST

Pushkar Jog Post: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुष्कर जोगला त्याची जात विचारली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता पुष्करने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pushkar Jog
Pushkar Jog

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग सध्या चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर राज्यात सुरु असलेल्या मराठा जातीय सर्वेक्षणावरुन संताप व्यक्त होता. मात्र महापालिकेच्या महिलेबद्दल पुष्करने केलेले व्यक्तव्य अनेकांना खटकले आहे. ही पोस्ट वादाचा विषय ठरत असतानाच पुष्करने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीय सर्वेक्षण केले जात आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. पुष्कर जोगच्या घरीदेखील बीएमसीमधील महिला कर्मचारी गेली होती. त्या महिला कर्मचारीने जात विचारलेले पुष्करला आवडले नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. त्यानंतर अभिनेते किरण माने, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
वाचा: BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यानंतर पुष्कर जोगची संतप्त पोस्ट

Pushkar Jog
Pushkar Jog

पुष्करने व्यक्त केली दिलगिरी

“मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असे पुष्कर म्हणाला.

काय होती पुष्करची पोस्ट?

रविवारी पुष्करने “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट केली होती.

WhatsApp channel

विभाग