Laxmikant Berde Brother: मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख केला जातो. ते मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत होते. मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. पण १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ, लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आजही अनेक कार्यक्रमात सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अशोक सराफ हे बडे कलाकार लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत भावूक होताना दिसतात. नुकताच पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या भाष्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाचा: प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून होणार; लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा
पुरुषोत्तम यांनी एका वेब पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की 'लक्ष्याने स्वत:ला संपवले. ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने ते केले नाही. शरीर हे तुमचे फार महत्त्वाचं माध्यम असते, जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार. त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल, तेव्हा तुमचं सगळे संपते, हेच नेमके लक्ष्याच्या बाबतीत झाले.'
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
पुढे ते म्हणाले, 'लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही. मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही, तू ह्या गोष्टींपासून लांब रहा. जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरु झाले. पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्मची गरज होती. लक्ष्याने कायम त्याला जे हवे तेच केले. त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं. त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही. जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर हेच त्यानं संपवलं आणि स्वत:लाही. पण याची जाणीव त्याला अगदी शेवटाला झाली. तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं. सर आली धावून हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक.'
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनायच्या प्रवासाला सुरुवात करताच मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. ‘टुरटुर’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘शांतेचं कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा काही नाटकांमध्ये काम केले. हळहळू लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रिय वाढत गेली. त्यांना सर्वजण 'लक्ष्या' या नावाने ओळखू लागले.