Diljit Dosanjh: पंजाबी गायक दिलजीत दोसांझची सध्या जगभरात क्रेझ पाहायला मिळते. जगभरात लाइव्ह कॉन्सर्ट झाल्यानंतर तो भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करताना दिसत आहे. त्याची ‘दिलूमिनाटी इंडिया टुर’ सुरु आहे. नुकताच दिलजीतचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. दरम्यान, एका महिलेला अतिशय वाईट अनुभव आला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया महिलेसोबत नेमकं काय घडलं?
१९ डिसेंबर रोजी दिलजीत दोसांजचा मुंबईत कॉन्सर्ट होता. या कान्सर्टला लाखो चाहत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान नक्की काय झाले याबद्दल एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. दिलजीतच्या एका चाहतीने कॉन्सर्टमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. या कॉन्सर्टसाठी तिने १२ हजार रुपये खर्च करुनही तिला फार वाईट अनुभव आल्याने तिने संताप व्यक्त केला आहे.
चाहतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कॉन्सर्टमधील अनुभव शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “ती रात्र माझ्यासाठी सगळ्यात वाईट रात्र होती. मी १२ हजार रुपये खर्च करुन गोल्डन पास खरेदी केला होता. पण मला काहीही दिसले नाही. तसेच तिथे ज्या बायका उभ्या होत्या. त्यांनी मला शांत राहण्यासाठी सांगितले होते. तसेच त्या ठिकाणी जागा नव्हती. त्या ठिकाणी मी केसदेखील सोडू शकले नाही. पण मी केस बंधावेत अशी त्यांची इच्छा होती. हा कॉन्सर्ट आहे की लोकल?” असे चाहतीने म्हटले आहे.
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
या पोस्टमध्ये चाहतीने, “तिथे माझ्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि मी विचारले असता खूप गर्दी असल्याचे कारण सांगितले. माझ्यासाठी हा खूप वाईट अनुभव होता. तिथली मुलं माझ्यावर पडत होती. हा व्हिडीओ माझ्या बहिणीने पाहिला तेव्हा तिला खूप वाईट वाटले. माझ्यामुळे त्रास होत असल्याचे तिथल्या बायकांनी सांगितले. जर शांत राहता येत नसेल तर अशा कॉन्सर्टला येऊ नये असा सल्लादेखील मला त्या बायकांनी दिला. या कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला” असे पुढे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या