सध्या संपूर्ण जगभरात लाइव्ह कॉन्सर्टचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक गायकांचे लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतात. कधी चाहते गायकाच्या अंगावर काही फेकून मारतात तर कधी रागाच्या भरात गायक काही तरी चुकीचे कृत्य करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गायक भर कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडल्याचे दिसत आहे. आता हा गायक कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पंजाबी गायक दिलजीत दोसांज दिसत आहे. सध्या दिलजील ‘दिल-लुमिनाटी टूर’वर आहे. या टूर अंतर्गत तो जगभरात परफॉर्म करताना दिसत आहे. लाखो चाहत्यांनी दिलजीतच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामधून त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम स्पष्टपणे दिसते. अशातच नुकताच त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसून येत आहे. मात्र, एका शो दरम्यान परफॉर्मन्स करताना तो तोंडावर पडल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिलजीत मंचावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने २०१३ सालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळीदेखील दिलजीत मंचावर पडला होता आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “जेव्हापण पडला दुप्पट प्रसिद्धी मिळाली आहे याला”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “१० वर्षात एकदा तरी पडणं व्हायलाच पाहिजे”.
अमेरिका, कॅनडा आणि युरोपचा दौरा केल्यानंतर दिलजीतने दिल-लुमिनाती टूर भारतात आणली आहे. दिल-लुमिनाती टूरने त्याला आंतरराष्ट्रीय आयकॉन म्हणून प्रस्थापित केले. त्याच्या भारत दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि काही मिनिटांतच त्याची तिकिटे विकली गेली. याविषयी बोलताना दिलजीत म्हणाला होता की, 'त्याच्या आगामी दिल-लुमिनाती इंडिया टूर २०२४ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो होतो. जो २.५ लाख तिकिटांच्या विक्रीसह भारतातील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा कॉन्सर्ट टूर ठरला होता.'
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
अहमदाबाद पाठोपाठ दिलजीत २२ नोव्हेंबरला लखनौमध्ये आपल्या दिल-लुमिनाती टूरअंतर्गत परफॉर्म करणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबरला पुणे, ३० नोव्हेंबरला कोलकाता, ६ डिसेंबरला बेंगळुरू, ८ डिसेंबरला इंदूर आणि १४ डिसेंबरला चंदीगडला कार्यक्रम सादर करणार आहे. २९ डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे तो या संगीत दौऱ्याचा समारोप करणार आहे.