मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Daljeet Kaur Passed Away : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन
दलजीत कौर
दलजीत कौर (HT)

Daljeet Kaur Passed Away : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन

18 November 2022, 12:24 ISTAarti Vilas Borade

Daljeet Kaur : अभिनेत्री दलजीत कौर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

पंजाबी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दलजीत कौर यांच्या निधनाची माहिती बॉलिवूड गायक, रॅपर मिका सिंगने दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दलजीत कौर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पंजाबी चित्रपटसृष्टीमधील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या सुंदर आठवणी आज आपल्या सोबत राहिल्या आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो' या आशयाचे ट्वीट मिका सिंगने केले आहे.

दलजीत कौर यांनी १९७६ साली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. ७० पेक्षा अधिक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी १० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटात काम केले. दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दलजीत यांनी पती हरमिंदर सिंहच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये काम करणे बंद केले. पतीच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. त्या आजारी पडल्या. २००१ साली त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केला. पण आता प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे.

विभाग