'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत आकाश आणि वसुच्या लग्नानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आकाश वसूला काही तरी खास सरप्राईज देणार आहे. आता हे सरप्राईज काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू आणि बनीच्या नात्यात दुरावा दर क्षणी वाढत चालला आहे. वसुला दुःखी पाहून आकाश तिच्यासाठी काही तरी खास करायचं म्हणून घरात पाणीपुरी पार्टीचे आयोजन करतो, पण वसुला बनीसोबतच्या तिच्या पाणीपुरीच्या आठवणी आठवतात. ही पाणीपुरी पार्टी घरात चालू असतानाच जयश्री बनीला फोन करून त्याच्या मनात गैरसमज निर्माण करते की त्याच्या अनुपस्थितीत घरात सगळे पार्टीचा आनंद घेत आहेत. जयश्री फोनवर बोलत असताना वसु त्यांना पकडते.
वसू बनीला कॉल करून वचन देते की ती दुसऱ्या दिवशी त्याला भेटेल. बनी वसूला भेटण्यास उत्सुक असताना जयश्री काहीतरी कारस्थान करून वसूला थांबवते. बनी वसूची वाट पाहत राहतो आणि ती न आल्याने खूप दुःखी होतो. बनी एका मित्राच्या मदतीने रात्रीच्या वेळी वॉर्डनपासून लपून त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करतो.
वाचा: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?
इकडे घरी जयश्री वसूवर ठाकूरांच्या वारसासाठी दबाव टाकतेय. दुसऱ्यादिवशी आकाश घोषणा करतो की तो वसूला घेऊन हनिमूनला जात आहे, हे ऐकून वसूला धक्का बसतो. या हनीमूनच्या निमित्ताने आकाश कडून वसुला काय खास सरप्राईझ मिळणार ? हॉस्टेल मध्ये बनी आईच्या वाढदिवसासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवतो आहे, पण हे ग्रीटिंग कार्ड वसुपर्यंत पोहोचेल ? बनी वसूची भेट होऊ शकेल का ? जयश्रीच वारस मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. या प्रश्नाची उत्तरे त्यांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. त्यामुळे मालिकेचा आगामी भाग नक्की पाहा.