'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत आकाश आणि वसुच्या लग्नानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आकाशने वसुची गुंडांपासून रक्षा केली आहे.
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसूच्या आग्रहाखातर आकाश सुशीला आणि सुधीरसोबत (वसूच्या आई बाबांबरोबर) डिनरला गेले असताना आकाशाला वसूच्या संगीताच्या कौशल्याबद्दल कळते. त्यानंतर आकाश गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो. वसुंधरा सुरुवातीला आकाशला नाही बोलते. पण तो काही केल्या ऐकायला तयार नाही. शेवटी वसुंधरा आकाशची ही इच्छा पूर्ण करते.
डिनर नंतर, आकाश आणि वसू घरी परतत असताना. तेवढ्यात जोरदार पाऊस आणि वादळामुळे ते दोघेही अडकतात. तिथे एक व्यक्ती वसूची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. पण आकाश त्याला चांगलंच धडा शिकवतो. इकडे वसूला आकाशचे एक वेगळे रूप दिसते. आता त्यामुळे आकाश आणि वसू यांच्या नात्यामध्ये काय नवे वळण येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?
पावसामुळे रस्ता बंद झाल्याने वसू आणि आकाश आई बाबांच्या घरी जातात. तिथे वसूचे बाबा वसूला संपत्तीच्या कागदांबद्दल कळेल म्हणून घाबरतात. पण वसुच्या हाताला तो कागद लागतो तेव्हा समजत की बाबांनी सगळी संपत्ती बनीच्या नावावर केली आहे. आता आकाश आणि वसुचे नाते कुठच वळण घेईल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या काळात कळणार आहे.
संबंधित बातम्या