Punha Kartavya Aahe Latest Update : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करत आहे. विशाखा कर्जाच्या डोंगराखाली अडकली आहे. एक-दोन नव्हे तर तिच्यावर तब्बल ५० लाखांचं कर्ज झालं आहे. याच कर्जातून बाहेर पडण्यासाठी विशाखा तिच्या मुलीची म्हणजेच तनयाची मदत मागत आहे. तर, तनया घरातील सगळ्यांपासून लपून कंपनीतील ५० लाख विशाखाला देत असते. मात्र, त्याचवेळी हा प्लॅन वसुंधराला कळल्यामुळे तिने हा प्लॅन उधळून लावला होता. आता तनया तिच्यासमोर हात जोडून पैसे मागणार आहे.
आता वसुंधरा तिला पैसे देण्यासाठी एक अट ठेवणार आहे, की विशाखाने एक कोऱ्या कागदावर सही करावी. सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, तनयाला घरातील सगळे काम एकटीने करावी लागतील. तनया सगळी घरकामं एकटीनेच करतेय, ज्यामुळे ती विशाखावर चिडू लागते. या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचं निदान होतं. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. पण तनया खरच गरोदर आहे का? हे कुणालाच माहीत नाही.
तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घरची कामं पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते, ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावं लागतं. एवढं असूनही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते . दरम्यान, वसुंधराला कळतं की, विशाखाला कोणीतरी व्यक्ती ब्लॅकमेल करतेय. ब्लॅकमेल करणारा तोच व्यक्ती आहे, ज्याने यापूर्वी आकाशवर गोळी झाडली होती. आकाश ठरवतो की, वसुंधरा आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सगळे एकत्र सहलीला जातील.
सहलीची तयारी करत असताना, वसुंधराला काही धागेदोरे मिळतात, ज्यामुळे तिला वाटतं की तनया, विशाखा आणि अखिल तिच्या आणि आकाशविरोधात कट करत आहेत. वसुंधराला संशय येतो की तनया आणि विशाखाच्या लकी सोबत काहीतरी प्लॅन करतायत. इकडे विशाखाने आकाश आणि वसुंधराला संपवण्याचा निर्धार केला आहे. आता वसुंधराला हा प्लॅन कळेल का आणि ती यातून आकाश आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकेल का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या