‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाची अनोखी गोष्ट, दोन पद्धतीने केले लग्न
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाची अनोखी गोष्ट, दोन पद्धतीने केले लग्न

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाची अनोखी गोष्ट, दोन पद्धतीने केले लग्न

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 05, 2024 08:27 AM IST

सध्या सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाच्या चर्चा रंगली आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Akshay Mhatre
Akshay Mhatre

हिंदी मालिकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता अक्षय म्हात्रेने मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आता अक्षयच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. तो लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नातील फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

कोण आहे अक्षयची पत्नी?

अक्षयचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून त्याची पत्नी हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचं नाव आहे श्रेनू पारीख आहे. श्रेनूने ‘इस प्यार को क्या नाम दूँ २’, ‘इश्कबाज’ सारख्या मालिकांमधून स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचे लाखो चाहते आहेत. आता श्रेनूने अक्षयशी लग्न केल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अक्षयची प्यारवाली लव्हस्टोरी

‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या निमित्ताने श्रेनू आणि अक्षय यांची भेट झाली होती. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटले आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मग २१ डिसेबंर २०२३ रोजी त्यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली.

अक्षय हा मराठी असून त्याची पत्नी श्रेनू ही गुजराती कुटुंबामधील आहे. त्यामुळे लग्नावेळी दोघांच्या कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया होत्या? तसेच त्यांनी लग्न कोणत्या पद्धतीने केलेले असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम

अक्षयने त्याचे लग्न मराठी व गुजराती अशा दोन्ही पद्धतीने केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या लग्नात दोन्ही भटजी होते असंही म्हटलं. याबद्दल बोलताना श्रेनू असं म्हणाली की, “मी अक्षयच्या घरच्यांना अनेकदा भेटले होते आणि मला याची जाणीव झाली होती की, हे लोक पण माझ्या घरच्यांसारखेच आहेत. फक्त इतकंच की ते मराठी बोलतात आणि आम्ही गुजराती. मराठी व गुजराती या दोन्ही धर्मांत बऱ्यापैकी साम्य आहे. सण, संस्कृती व उत्सवांबाबत दोन्ही बऱ्यापैकी धर्मांत साम्य आहे. दिवाळी पाडवा मराठी लोकांमध्येही होतो आणि आमच्यातही होतो”.

‘ये दिल मांगे मोअर’, ‘पिया अलबेला’, ‘घर एक मंदिर’ या हिंदी मालिकांमध्ये अक्षयने काम केले आहे. त्यानंतर तो मराठीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आला.

Whats_app_banner