मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट

देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2024 12:35 PM IST

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या वसू आणि आकाशची चुका-मुक होताना दिसत आहे. आता देवीच्या दर्शनाला निघालेल्या दोघांची भेट होणार का? याविषयी जाणून घ्या…

देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट
देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट

'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत वसूंधरा आणि आकाशची कथा दाखवण्यात आली आहे. आकाश हा दोन जुळ्याच्या मुलींचा एकटा बाप असतो आणि वसुंधरा ही घटस्फोटीत असून तिला एक मुलगा आहे. आता मालिकेत या दोघांची कथा दाखवण्यात आली आहे. ते दोघे एकत्र येणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या वसू आणि आकाश यांची भेट होत नाही. त्यांच्या चुका- मुकीचा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. ते दोघे अद्याप एकमेकांसमोर आलेले नाहीत. वसू तिच्या आई-बाबांवर नाराज असल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी तिच्यासाठी जे स्थळ आणले होते ते निरखून न पाहाताच लग्न लावून दिले. हे स्थळ निरखून बघायला हवे होत असे सतत वसूला वाटत असते. त्या प्रसंगानंतर आता वसू पुन्हा लग्नाचा विषय नको असा सतत म्हणत असते. मात्र आई आणि बाबा काही ऐकायला तयार नसतात. त्यांनी वसूच्या लग्नासाठी देवीकडे साकडे घालायचे ठरवते आहे.

ठाकूर कुटुंब सुद्धा देवीच्या दर्शनाला निघाले आहेत. आकाशला अचानक काही तरी काम येते त्यामुळे त्याला जाणे शक्य होत नाही. दोन्ही कुटुंबीय रेल्वे स्टेशनला पोहोचतात. त्यातच बनी ट्रेन सोडून प्लॅटफॉर्म वर उरतो. बनी तेथे हरवतो. त्याची गाठ आकाशशी पडते. तेवढ्यात गाडी सुटते. आकाश धावत्या ट्रेनमध्ये बनीला घेतो आणि चढतो. त्यानंतर तो सुशीलाकडे म्हणजेच आजीकडे त्याला सुखरूप सोपावतो. तोपर्यंत गाडी पुढे आलेली असते. त्यामुळे आकाश देखील देवीच्या दर्शनासाठी निघतो.

वसूला समजते की आकाश ठाकुरनी बनीला शोधले आणि सुखरूप ट्रेनमध्ये चढवले. ती आकाशचे आभार मानण्याच निर्णय घेते. आकाशला ट्रेनमध्ये पाहून ठाकूर कुटुंबींयांना आनंद होतो. जयश्रीला तिची प्रार्थना देवीने ऐकली असेच वाटू लागते. अखिलला वसू आणि आकाशमध्ये काही तरी खास गोष्ट असल्याचे लक्षात येते. जिच्या मुलामुळे आकाश देवीच्या दर्शनासाठीसोबत येतो तिच खरी आकाशची होणारी बायको होऊ शकते. असे तो अवनीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना वसूच्या गळ्यात आकाशची चेन दिसते. त्यानंतर ट्रेनमधे जयश्रीला वसू दिसते. पण वसूचे चुकीचे इंप्रेशन तिच्या समोर निर्माण होते.

आता देवीच्या मंदिरात आकाश आणि वसूची खरच भेट होणार का? जयश्रीचा वसू बद्दल झालेला गैरसमज दूर होणार का? अवनीला वसू पसंत पडेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना आगामी भागात मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग