मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण

बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 03, 2024 06:24 PM IST

'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूचे लग्न लावण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. पण बनीने आकाशला लग्नापूर्वीच बाबा म्हणून आवाज दिला आहे. तर दुसरीकडे मंगलने चिनू आणि मनूला वसूबद्दल सांगितले चुकीचे आहे. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घेऊया…

बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये नवे वळण
बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये नवे वळण

दोन जुळ्याच्या मुलींचा एकटा बाप आणि एक घटस्फोटीत मुलाची आई असलेल्या वसूंधराची कथा 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेतील आकाश आणि वसूची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. ते दोघे अद्याप एकत्र आलेले नाहीत. त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. वसूची सासू सुशीला काहीकरून वसूचं लग्न लावायचे आहे असे सांगते. इकडे जयश्रीपण मोहनकडे हट्ट धरते की काहीकरून आकाशला बोहल्यावर चढवण्याचा निर्णय घेते. आकाशही पुन्हा लग्न करायला तयार झाला आहे. एकीकडे सुशीला वसुकडून होकार मिळवायचा प्रयत्न करते. तसेच सुशीला वसूचा फोटो आकाशच्या घरी पाठवते. वसुंधराला मुलगा असल्याने आकाश सर्व प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावावर करू शकतो आणि चिनू-मनू वर दुर्लक्ष होईल असे जयश्रीचा समज होतो. ती एक अट घालते या लग्नासाठी. वसूने भूतकाळचे सर्व पाश आणि तिचे अपत्य मागे ठेवूनच आकाशशी लग्न करावे.
वाचा: गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

मंगलने चिनू आणि मनूला वसूबद्दल सांगितले चुकीचे

दरम्यान वसूचे फोटो आकाशच्या घरी पोहोचतात. मंगल वसूचे फोटो आकाशच्या खोलीत ठेवण्यासाठी जाते. तेव्हा तेथे चिनू मनूला डिवचते की नवीन आई येणार आहे. ती तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. चिनू मनूच्या मनात भीती निर्माण होते आणि ते पाहून आकाश लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकतो. तिकडे वसूही बनीला वचन देते की लग्नाच्या स्वार्थी विचाराने त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही.
वाचा: शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

बनीने पाहिला आकाशचा फोटो

बनीला शाळेत आई बाबांवर निबंध लिहून आणायला सांगितलेला असतो. त्यामुळे तो वसूकडे हट्ट धरतो की बाबांची ओळख सांग. हे सर्व होत असताना बेबी काका आकाशचे फोटो घेऊन सुधीरकडे आलेले असतात. सुशीला आणि सुधीर आकाशचे फोटो गुपचूप वसूच्या खोलीत ठेवतात. ते फोटो बनीच्या हाती लागतात. आकाशचे फोटो बघून हाच आपला बाबा असल्याचे त्याला वाटते. दुसऱ्या दिवशी बनी भररस्त्यात आकाशला पाहून फोटोवले बाबा म्हणून हाक मारतो. आता काय होईल जेव्हा आकाश बनीची ही हाक ऐकणार? वसू बनीला कसे समजावणार ? कसे जुळेल आकाश आणि वसूच नाते ? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

IPL_Entry_Point