मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pulkit Samrat Affairs: सलमान खानची बहिणच नाही, तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय पुलकित सम्राटचं नाव!

Pulkit Samrat Affairs: सलमान खानची बहिणच नाही, तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय पुलकित सम्राटचं नाव!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 13, 2024 08:24 AM IST

Pulkit Samrat Love Affairs: पुलकित सम्राट याचे पहिले लग्न काही महिन्यांतच मोडले होते. तर, त्याचे अनेक अभिनेत्रींसोबतच्या अफेअरचे किस्सेही समोर आले होते.

Pulkit Samrat Love Affairs
Pulkit Samrat Love Affairs

Pulkit Samrat Love Affairs: नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. मात्र, हे वर्ष सुरू होताच बॉलिवूडकरांची लगीनघाई देखील सुरू झाली. अवघ्या दोन महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्न उरकले आहे. आता या यादीत अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांचीही नावे जोडली जाणार आहेत. पुलकित आणि क्रिती येत्या १५ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. हरियाणातील मानेसर येथे दोघे लग्न करणार असून, १५ मार्च रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न होणार आहे. पुलकित आणि क्रिती खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

पुलकित सम्राट याचे हे दुसरे लग्न आहे. तर, क्रिती खरबंदाचे हे पहिले लग्न आहे. पुलकितचे पहिले लग्न काही महिन्यांतच मोडले होते. तर, त्याचे अनेक अभिनेत्रींसोबतच्या अफेअरचे किस्सेही समोर आले होते. पुलकित अनेक वर्षांपासून क्रितीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण, त्याआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

Shaitaan Box Office Collection: रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांत ‘शैतान’नं केलं बजेट वसूल! किती झाली कमाई?

का मोडलं पहिलं लग्न?

२०१४मध्ये पुलकित सम्राटने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांचा हा प्रेमविवाह होता. मात्र, त्यांचे हे लग्न केवळ ११ महिने टिकले. पुलकित श्वेताच्या विभक्त होण्याचे कारण देखील एक बॉलिवूड होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर श्वेता म्हणाली होती की, 'यामी गौतमने माझे लग्न मोडले होते. त्या धक्क्यातून मी आता बाहेर आले आहे. ती आमच्या आयुष्यात येईपर्यंत आमच्यात सर्व काही ठीक होते. २०१५मध्ये माझा गर्भपात झाला होता आणि त्यादरम्यानच पुलकित यामीला डेट करू लागला होता.’ मात्र, पुलकितने त्याच्या पूर्वपत्नीच्या या दाव्यांवर कधीही स्पष्टीकरण दिले नाही.

Navri Mile Hitler La Cast: राकेश बापट ते सानिका काशीकर; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत कोण कोण दिसणार?

पुलकित सम्राट आणि यामी गौतम या जोडीचे एकाच वर्षी तीन बॅक टू बॅक चित्रपट आले. त्यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. दोघांनी 'सनम रे', 'आबरा का डबरा' आणि 'जुनूनियत'मध्ये एकत्र काम केले होते. या तीन चित्रपटांमध्ये पुलकितची यामीसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. रिपोर्ट्सनुसार, याचदरम्यान पुलकित आणि यामी यांच्यात प्रेम फुलले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि यामीसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच पुलकितने क्रिती खरबंदाला डेट करायला सुरुवात केली. आता ते दोघेही लग्न करणार आहेत.

मौनी रॉयशीही जोडले गेले नाव!

एकता कपूरच्या सुपरहिट मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये लक्ष्य आणि केटीची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. या मालिकेमध्ये लक्ष्य-केटीची भूमिका पुलकित सम्राट आणि मौनी रॉय यांनी साकारली होती. पुलकित आणि मौनीला एकता कपूरच्या या मालिकेतूनच ओळख मिळाली होती. त्यादरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप देखील झाले.

WhatsApp channel