Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding Video: बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा आता लग्नबंधनात अडकले आहेत. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने १५ मार्च रोजी दिल्ली एनसीआरच्या मानेसर येथील आयटीसी ग्रँड भारत येथे सात फेरे घेतले. नेहमीप्रमाणेच चाहत्यांना या बॉलिवूडकरांच्या लग्नाची खूप उत्सुकता होती. सगळेच चाहते वधू-वराच्या लग्न सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. लग्नानंतर क्रिती आणि पुलकितच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या दरम्यान, नवविवाहित जोडप्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही ढोल ताशांच्या तालावर जोरदार नाचताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्न सोहळ्यातील व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नववधूच्या स्वागताचा आणि गृहप्रवेशाचा आहे. या व्हिडीओमध्ये पुलकितच्या कुटुंबाकडून नववधू क्रितीचे किती जोरात स्वागत केले जात आहे.
व्हिडीओत पुलकित आणि क्रिती त्यांच्या कारमधून त्यांच्या सासरच्या घरी पोहोचतात, जिथे आधीच ढोल वाजत असतात. त्यानंतर ही नवविवाहित जोडी देखील जोरदार डान्स करते. त्याच वेळी, पुलकितची आईही तिची सून आणि मुलावर नोटांचा वर्षाव करताना दिसली आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करून चाहते दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी त्यांच्या लग्नासाठी खास आउटफिट निवडले होते. दोघांनी मॅचिंग ऐवजी वेगवेगळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. क्रितीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यावर भारी फ्लोरल एम्ब्रॉयडरीचा पॅच आणि सिक्विन वर्क करण्यात आले होते. यामुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसत होता. यासोबत तिने भरजरी दागिने घातले होते. तिने कपाळावर बिंदी, गळ्यात हार आणि सुंदर अंगठी घातली होती. तर, पुलकितने मिंट हिरव्या रंगाचा शेरवानी घातला होती, ज्यामध्ये नवरदेव खूपच सुंदर दिसत होता. पुलकितच्या या आउटफिटची खास गोष्ट म्हणजे त्यावर गायत्री मंत्र लिहिलेला होता. त्यांच्या लग्नाचे कपडे डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केले होते.
संबंधित बातम्या