आमदार धीरज देशमुख यांच्या सासऱ्याला नेटफ्लिक्सनं लावला ४७ कोटींचा चुना? काय आहे प्रकरण?-producer vashu bhagnani accused netflix india of cheating him to the tune of rs 47crore rupees ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आमदार धीरज देशमुख यांच्या सासऱ्याला नेटफ्लिक्सनं लावला ४७ कोटींचा चुना? काय आहे प्रकरण?

आमदार धीरज देशमुख यांच्या सासऱ्याला नेटफ्लिक्सनं लावला ४७ कोटींचा चुना? काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 26, 2024 10:01 AM IST

Vashu Bhagnani Netflix Controversy: आमदार धिरज देशमुख यांचे सासरे वाशू भगनानी यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया...

Vashu Bhagnani Netflix Controversy
Vashu Bhagnani Netflix Controversy

Vashu Bhagnani Netflix Controversy: आमदार धिरज देशमुख यांचे सासरे, बॉलिवूड चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांनी नेटफ्लिक्स इंडियावर ४७.३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. वाशू यांची पूजा एंटरटेनमेंट नावाची एक कपंनी आहे. या कंपनीच्या प्रमुखांनी दावा केला आहे की, नेटफ्लिक्स इंडियाने त्यांची ४७ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मात्र, याबाबत नेटफ्लिक्सने दिलेले हे अतिशय वेगळे असल्याचे पाहायला मिळाले.

वाशू भगनानी यांचा नेटफ्लिक्सवर आरोप

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, वाशू यांनी नेटफ्लिक्सवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नेटफ्लिक्सने वाशू यांच्या 'हिरो नंबर 1', 'मिशन राणीगंज' आणि 'बडे मियां छोटे मियाँ' या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे हक्क खरेदी केले. मात्र, हक्क खरेदी केल्यावर पैसे दिसे नसल्याचा दावा वाशू यांनी केला आहे. त्यामुळे वाशू यांनी लॉस गॅटोस प्रॉडक्शन सर्व्हिसेस इंडिया विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने EOW या प्रॉडक्शन हाऊसलाही समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. वाशू यांनी केलेल्या आरोपानंतर नेटफ्लिक्सने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

नेटफ्लिक्सने दिले स्पष्टीकरण

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट वाशू यांच्या पूजा एंटरटेनमेंटकडे नेटफ्लिक्सचे पैसे थकले आहेत असा दावा देखील नेटफ्लिक्सने केला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "हे दावे पूर्णपणे निराधार आहेत. खरं तर पूजा एंटरटेन्मेंटकडे नेटफ्लिक्सचे पैसे आहेत. भारतीय क्रिएटिव्ह कम्युनिटीसोबत भागीदारीचा आमचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि हा वाद सोडवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत."
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य

यापूर्वी वाशू आणि अली अब्बास जफर यांच्यामध्येही झाला होता वाद

वाशू बडे मियाँ छोटे मियाँचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याशी झालेल्या वादामुळे देखील चर्चेत आले होते. चित्रपटाच्या अपयशानंतर क्रूने त्ंयाच्यावर राहिलेले पैसे न दिल्याचा आरोप केला होता. निर्मात्याने अद्याप ७.३० कोटी रुपये दिलेले नाहीत, असा दावाही अली अब्बास जफरने केला. वाशू आणि त्यांच्यासोबत पूजा एंटरटेनमेंट चालवणारा त्यांचा मुलगा जॅकी भगनानी यांनी चित्रीकरणादरम्यान अबू धाबी अधिकाऱ्यांकडून ९.५० कोटी रुपयांची सबसिडी घेतली होती. पण चित्रपटासाठी हे पैसे मिळालेच नाहीत अशी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी भगनानी यांनी या विरोधात खंडणी, जबरदस्ती आणि मानहानी केल्याची तक्रार दाखल केली.

Whats_app_banner
विभाग