चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना तक्रारदाराला तीन महिन्यांत ३ लाख ७२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरूंगावास होणार आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी २१ जानेवारी रोजी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात रामगोपाल वर्मा यांच्या सात वर्षांपूर्वीच्या चेक बाऊन्स प्रकरणाची सुनावणी झाली. पण रोम गोपाल वर्मा या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ अन्वये रामगोपाल वर्मा यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२०१८मध्ये 'श्री' नावाच्या कंपनीने राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीविरोधात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला होता. रामगोपाल वर्मा यांच्या कंपनीने पैसे न दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे प्रकरण राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या फर्मशी संबंधित आहे. या कंपनीअंतर्गत त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारखे चित्रपट बनवले होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यातच कोविड महामारीदरम्यान ही कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. यामुळे त्यांना त्यांचं कार्यालयसुद्धा विकावं लागलं होतं. या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांना न्यायालयाने जून २०२२ मध्ये पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
वाचा: AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर
'सत्या', 'रंगीला' आणि 'कंपनी' यांसारखे सिनेमे बनवणारे रामगोपाल वर्मा गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोना काळात आर्थिक संकटामुळे त्यांना आपलं ऑफिस विकावं लागलं होतं. मात्र, आता तो आपल्या आगामी 'सिंडिकेट' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.
संबंधित बातम्या